काँग्रेसने ‘बी’ टिम म्हणल्याने आमची मते कमी झाली – पाटील

0
114


उस्मानाबाद – लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला काँग्रेसने भाजपची ‘बी’ टीम म्हणल्याने लोकांमध्ये संभ्रम होऊन वंचितची मते कमी झाल्याचा आरोप अॅड. आण्णाराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. 

उस्मानाबाद येथे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या तत्पूर्वी पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला तसेच काँग्रेसने याबाबतीत खुलासा केल्यास आघाडीच्या बाबतीत चर्चा करू अन्यथा आम्ही चर्चेला बसणार नाहीत  असेही त्यांनी सांगितले. उस्मानाबाद जिल्ह्यात मुलाखतीसाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील चारीही विधानसभा मतदारसंघात सक्षम उमेदवार देणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यतील शेती, पाणी, बेरोजगारी असे विषय वंचितच्या अजेंड्यावर आहेत. उस्मानाबाद- कळंब विधानसभेची जागा एमआयएमला सोडणार का असा प्रश्न विचारल्यानंतर त्याबाबतीत एमआयएमचा प्रस्ताव आला नाही तसा प्रस्ताव आल्यास त्याबाबत विचार करू असे पाटील म्हणाले. यावेळी रेखाताई ठाकूर, अशोक सोनोणे, राम कारकर , सुभाष वाघमारे आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here