शाळेच्या तक्रारीचा ग्रामस्थांनी वाच पाढा , मोठा अनर्थ टळला!
उमरगा दि . २५ प्रतिनीधी : उमरगा तालुक्यातील त्रिकोळी येथील शालेय पोषण आहारातील दुपारच्या जेवणात पाल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून विद्यार्थी व ग्रामस्थांनमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे . ही घटना मंगळवारी दि.२४ रोजी घडली.
उमरगा तालुक्यातील त्रिकोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जवळपास २६४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत . शाळेतील विद्यार्थ्यांना दुपारचे मध्यान्ह भोजन दिले जाते . मंगळवारी शाळेतील विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण दिले असता शाळेतील इयत्ता ४ थीत शिकणाऱ्या तृप्ती किशोर वाडीकर या विद्यार्थ्यांनीने दिलेलाभात शाळा सुटल्यानंतर घरी घेवून गेला. घरात तिने डब्बा उघडून पाहिल्यानंतर तीला डब्ब्यात पाल आढळून आली . तीने तीच्या पालकांच्या निदर्शनास ही बाब आनुन दिले ,तीच्या पालकांनी सदर घटनेची माहीती मुख्याध्यापक व शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षाला भ्रमणध्वनी वरुन दिली .
बुधवारी दि.२५ रोजी मध्यान्ह भोजन शालेय पोषण आहार अधिक्षक व्ही.जी राठोड व विस्तार अधिकारी शिवकुमार बिराजदार यांनी शाळेत येवून पंचनामा केला. शाळेतील होणाऱ्या गंभीर घटनेच्या ग्रामस्थामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या गावातील पालकांनी शाळेत ठिय्या मांडला तसेच संतप्त पालकांनी मुख्याध्यापक व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले ग्रामस्थांनी शाळेतील इतर अडचणीचनी बाबतीत ही आक्षेप घेतला तसेच मुख्याध्यापकाच्या बदलीसाठी गावातील लोकांनी अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे . सदरील घटनेचा पंचनामा करण्यात आला असुन भात प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे . कुठल्याच विद्याार्थ्याना त्रास झाल्याची तक्रार नाही यामुुळे मोठा अनर्थ टळला असल्याची चर्चा ग्रामस्थातुन होती .
यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष विकास पाटिल , सरपंच रविंद्र हंगरगे , चेअरमन भीमराव पाटिल , प्रविण जाधव , शिवाजी सुरवसे , गोरख तेलंग , हरीदास सुरवसे , प्रभाकर बिराजदार , विठ्ठल कुर्लेकर , सुग्रीव वाडीकर , संतराम काळे , शिवाजी बिराजदार , गणपती मिरगाळे , विष्णू बिराजदार यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते .
———–
शालेय पोषण आहार इतर विद्यार्थी व शिक्षकांनीही खाल्लेला असुन त्यांना कोणतीही विषबाधा किंवा त्रास झालेला नाही . घरी घेवुन गेलेल्या डब्यात पाल आढळली आहे . पुढील योग्य ती कार्यवाही सुरू आहे -_बिराजदार एस.व्ही. ( विस्तार अधिकारी पं .स. शिक्षण )