लहान बालकांची सुरक्षा ही समाजाची जबाबदारी- डॉ.मृणालिनी पंडीत बुटूकने
उस्मानाबाद-
डॉ.सह्याद्री फाऊंडेशन्स उस्मानाबाद यांच्या वतीने, बालक व किशोरवयीन मुलांमुलींसाठी ‘नकोसा स्पर्श’ (गुड टच बँड टच) या विषयाचे प्रबोधन करण्यासाठी तुरोरी ता उमरगा येथील श्री. ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे कार्यक्रम घेण्यात आला.
उमरगा येथील स्त्री रोग तज्ञ डॉ.मृणालिनी पंडीत बुटूकने या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. चांगला ‘स्पर्श व वाईट स्पर्श’ या विषयावर सर्व समाजात अधिक मंथन व जागृती निर्माण होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच लहान मुलांना असुरक्षित वाटत असल्यास त्यांनी पालक, शिक्षक, पोलीस किंवा चाइल्ड लाईन संस्थेच्या ‘1098’ या टोल फ्री नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन केले.
सह्याद्री फाऊंडेशन्स च्या सचिव व स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. वसुधा दिग्गज दापके- देशमुख यांच्या संकल्पनेतून उस्मानाबाद जिल्ह्यात विविध शाळेत अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य एस.वाय.जाधव यांनी भुषविले.प्रास्ताविक व सुत्रसंचालन जी.बी.दुधभाते तर आभार सह्याद्री फाऊंडेशन्सचे समन्वयक राजेंद्र कापसे यांनी मानले. यावेळी शिक्षक श्रीमती एस.ए.शिंदे, के.ए.शिंदे, एस.एस.तिर्थकर, पालक, कर्मचारी, इ.मान्यवर उपस्थित होते