उस्मानाबाद जिल्ह्याचे राजकारण नेहमी व्यक्तीविरोधी राहीले आहे एव्हाना ते परिवार विरोधी राहीले आहे. ज्या काळात उस्मानाबाद जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे विकासाची कामे पदरात पाडून घेत होती त्या काळात उस्मानाबाद जिल्ह्यात नेतृत्वाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. नुकसान मात्र जिल्ह्याचे झाले. मंत्री असताना देखिल भावनिकतेच्या लाटेचा फटका बसल्याने हाती असलेला कौडगाव एम.आय.डी.सी.चा प्रकल्प रखडला गेला त्या कालावधीत जिल्ह्याकडे मधुकरराव चव्हाण यांच्या रूपाने पालकमंत्री पद असतानाही फाईल पुढे सरकली नाही. २०१४ च्या निवडणुकीत राणाजगजितसिंह पाटील यांनी परत विजय मिळवला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये मित्रपक्ष असलेली काँग्रेस सोयिस्कर रित्या सेनेला सोबत घेत सत्ता उपभोगत होती. पाटील परिवार विरूद्ध इतर सर्व असे समीकरण जिल्ह्याने वेळोवेळी पाहीले. ३ वर्षापूर्वी झालेल्या नगरपालिका आणि त्यानंतर झालेल्या जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत राणाजगजितसिंह पाटील यांनी विरोधकांना धूळ चारली आणि स्वतःची ताकद सिद्ध केली.
येत्या विधानसभा निवडणुकीत उस्मानाबाद जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघापैकी तिन मतदारसंघ उस्मानाबाद, भूम, उमरगा हे शिवसेनेकडे तर एकमेव तुळजापूर हा मतदारसंघ भाजपकडे आहे. भाजपने ही जबाबदारी राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे देण्यामागे जिल्ह्याच्या दृष्टीने चांगली कारणे असू शकतात. आजवर हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहीला आहे. एखादा गड ताब्यात घ्यायचा असेल तर त्यासाठी सिंहाची ताकद असलेला व्यक्ती लागतो असा इतिहास आहे. तुळजापूर तालुक्यात गेल्या पाच वर्षांत भाजपची वाढलेली ताकद पहाता पाटील विरूद्ध चव्हाण ही लढत रोमांचक होणार आहे.
सिंह एकला ! तुळजापूर मतदारसंघात होणार रोमांचक लढत!!
RELATED ARTICLES