back to top
Friday, November 22, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्यानळदुर्ग नगरपालीकेतील काँग्रेस पक्षाच्या राजकीय साम्राज्याला खिंडार दोन नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

नळदुर्ग नगरपालीकेतील काँग्रेस पक्षाच्या राजकीय साम्राज्याला खिंडार दोन नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

नळदुर्ग :- नळदुर्ग नगरपालिकेतील काँग्रेस पक्षाच्या पाच नगरसेवकांपैकी दोन नगरसेवकांनी ऐन विधानसभेच्या मतदानाच्या तोंडावर बंडाचा झेंडा घेत  तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील भाजप-सेना महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 18 ऑक्टोबर रोजी महायुतीच्या नळदुर्ग शहरातील प्रचार कार्यालयात भाजपामध्ये प्रवेश केल्याने नळदुर्ग नगरपालिकेतील काँग्रेस पक्षासह आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या राजकीय साम्राज्याला मोठ्या प्रमाणात खिंडार पडले आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कारण तीन वर्षापूर्वी नळदुर्ग नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली  लढलेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नय्यरपाशा जाहगिरदार, शहेबाज काजी, बसवराज धरणे, सुफिया कुरेशी, मन्नाबी कुरेशी हे पाच नगरसेवक निवडून आले होते. विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर गेल्या दहा दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडले होते. त्यामुळे नगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते असलेले नयरपाशा जागीरदार व नगरसेविका सुफिया कुरेशी यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस पक्षाच्या नळदुर्ग नगरपालिकेतील वर्चस्वाला जोरदार धक्का बसला आहे.कारण त्यांचे नळदुर्ग नगरपालिकेत तीनच नगरसेवक शिल्लक राहिले आहेत.तसेच नगरसेवक नयरपाशा जागीरदार व सुफिया कुरेशी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शहराचे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. कारण  नयरपाशा जागीरदार हे नळदुर्ग शहराच्या राजकारणामध्ये साम-दाम-दंड-भेद या युक्तीचा वापर करून काहीही उलटफेर करण्याची ख्याती राखतात अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे हि निवडणूक जरी विधानसभेची असली तरी भाजपमध्ये प्रवेश केल्याने नळदुर्ग शहरातील राजकीय पटावरील अनेक दिग्गज नेत्यांची आव्हाने त्यांच्यासमोर राहणार आहेत. कारण या निवडणुकीनंतर नगरपालिकेतील अनेक समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. त्यात ते कितपत यशस्वी होतात हे पाहणे महत्वाचे आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments