बार्शी प्रतिनिधी – गणेश घोलप
वैराग भागातील हत्तीज – रातंजन शिवारात एका शेतात संतोष सुरवसे या युवकांस एक लांडोर पक्षी आजारी अवस्थेत आढळून आला त्यांनी लगेच वैरागचे रहिवाशी असलेले प्राणी मित्र शशिकांत भगुरे यांना फोन करुन त्याची माहिती दिली. भगुरे यांनी तात्काळ वन विभागास कळविले. वन विभागाने याची त्वरीत दखल घेत कार्यालयात उपस्थित असलेले वन मजूर गुंड यांना त्याठिकाणी पाठवून तो आजारी लांडोर घेऊन वन मजुर गुंड व प्राणीमित्र शशिकांत भगुरे वैरागच्या पशुवैद्यकीय दवाखाना येथे घेऊन आले. तेथे कर्तव्यावर हजर असलेले डॉक्टर मांजरे यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. यावेळी डॉक्टर मांजरे यांनी लांडोर पक्षांस व्हायरल इन्फेक्शन झालेले आहे तरी त्याला किमान पंधरा ते वीस दिवस डॉक्टरांच्या निगराणी ठेवल्यास त्याचा आजार पुर्णपणे बरा होईल वैराग येथील पशुुवैद्यकिय दवाखानात किरकोळ उपचार करीत त्याच्या डोळ्यांच्या शेजारी झालेल्या जखमेची स्वच्छता केली व आतील घाण काढून टाकली तसेच पुढील उपचारासाठी या दवाखान्यात साधन सामुग्री उपलब्ध नसल्यानेे पुढील उपचारासाठी त्याला बार्शी येथील पशुुुवैद्यकिय दवाखान्यात पाठविण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर मांजरे यांनी दिली. यावेळी वैराग येथील प्राणीमित्र शशिकांत भगुरे, निलेश गवळी, संकेत ठेंगल, मोसिन शेख, कृष्णा चौगुले, मुन्ना सुतार व सोमेश्वर बहुउद्देेशीय संस्थेचे सदस्य उपस्थित होते. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक व अभिनंदन केले जात आहे .