पाडोळी – प्रतिनिधी
उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी(बें) येथील तेरणा नदीवर काल (दि९)राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती प्रदेशाध्यक्षा आणि जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
चालू वर्षाच्या मे- जून महिन्यामध्ये येथील तेरणा नदीचे भारतीय जैन संघटना आणि उस्मानाबाद जिल्हा परिषदच्या माध्यमातून जवळपास अडीच किलोमीटरचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले होते, आज मात्र परतीच्या पावसामुळे तेरणा नदीच मोठे पाणी येऊन गेले होते, आणि खोलीकरण झालेल्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने जवळपास पाडोळी, टाकळी(बें) कनगरा,बोरखेडा आणि धुत्ता या गावचे चारशे ते पाचशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मिटणार आहे. हे काम यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर यांनी या कामाचा मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला होता, त्यामुळे टाकळी(बें) येथील ग्रामस्थांच्या आग्रहाखातर सक्षणा सलगर यांनी गावास भेट देऊन तेरणा नदीच्या पात्रात साचलेल्या पाण्याचे जलपूजन केले. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष काकासाहेब सोनटक्के, शाहजहान पठाण, पाशुमिया शेख, अमोल सूर्यवंशी,सुरज लातुरे, अल्लाबक्ष पठाण, नजूमिया शेख, महमद शेख, आनंद कोळी यांच्या मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
जलपूजन झाल्यानंतर टाकळी(बें) येथील नागरिकांनी गावातील समस्यांचं पाढा वाचून दाखवला, गावातील पंचायत पाणी असून नळाला पाणी सोडत नाही, गावातील नाल्या अर्धवट साफ केल्या आहेत, गावातील दवाखाना सतत बंद असतो, याकडे लक्ष देऊन आपण संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात अशी मागणी केली. त्याच बरोबर सक्षणा सलगर यांनी टाकळी(बें) शिवारातील शेतरस्ते व्हावेत आणि तेरणा नदीवर बॅरेज होण्यासाठी आपण सतत पाठपुरावा करावा आणि निधी उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी केली आहे.