उस्मानाबाद – एरव्ही गाजनारी गोंधळात पार पडणारी उस्मानाबाद नगरपालिकेची सर्वसाधारण सभा शांततेत पार पडली. सभेमध्ये ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दीड लाख रुपयाचा निधी देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. गटनेते युवराज नळे यांनी १० लाख रुपयाची मागणी केली होती परंतु शासन निर्णयानुसार दीड लाख देता येत असल्याने नगरपालिकेला तेवढीच मदत करता येणार आहे.वि
षय पत्रिकेतील ३२ विषय चर्चा करून मंजूर करण्यात आले. त्यापैकी शहरातील शाळांची असणारी दुरुस्ती सीएसआर फंडातून करण्यात येणार आहे रक्कम कमी पडल्यास इतर निधी वापरून या दुरुस्ती करण्यात येणार आहेत. मालमत्ता कराचे सर्वेक्षण करताना ज्यांची एजन्सीच्या चुकीने भोगवटादार अशी नोंद झाली आहे अश्या नोंदी जुने रेकॉर्ड तपासून रद्द केल्या जाणार आहेत. या सर्वसाधारण सभेला नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळर मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
एक रस्ता पाडला महागात!
कचरा डेपोकडे जाणारा रस्ता वेळेत न झाल्याने त्याचे परिणाम शहरवासीयांना भोगावे लागले आहेत. ऑक्टोबर महिन्यात पावसाने उघडीप न दिल्याने कचरा डेपोच्या कच्च्या रस्त्यातून घंटागाडी आत जाऊ शकली नाही परिणामी कचरा संकलन कमी होऊन अस्वछता वाढून साथरोग बळावले. विशेष म्हणजे या रस्त्यासाठी नगराध्यक्षांनी बक्षिसाची रक्कम मंजूर केली आहे. अपुऱ्या पाठपुराव्यामुळे हा रस्ता अद्याप झाला नाही