पंचायत समिती सभापतींचे आरक्षण सोडत जाहीर

0
44
उस्मानाबाद – जिल्हयातील सर्व पंचायत समित्यांच्या सभापतींचे आरक्षण शुक्रवार दि. १३ रोजी जाहीर करण्यात आले. जिल्हातील ८ पैकी ५ समित्यायत महिलाराज असणार आहे. उस्मानाबाद (अनुसूचित जाती. महिला), उमरगा (इ मा प्र खुला), कळंब – (इ मा प्र महिला), तुळजापूर- (सर्वसाधारण महिला) भूम-  (सर्वसाधारण महिला), लोहारा –  (सर्वसाधारण महिला), परांडा- ( खुला) वाशी- (खुला) . जिल्हा परिषेदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शालेय विद्यर्थीनीच्या हस्ते चिट्टी काढून हि आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे, उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, जिल्हापरिषदेचे उ. मु.का. डॉ. संजय तुबाकले आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड २१ डिसेंबर पर्यंत घेण्यात येणार आहे.  साधारणत: जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या पूर्वीच पंचायत समिती सभापतींची निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रघात आहे. मात्र, तसे काही बंधनकारकही नाही. या प्रघातानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला तर आधी पंचायत समित्यांचा बार उडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here