सोलापूर-उस्मानाबादला मंत्रीमंडळात ठेंगा

0
72
शिवसेनेने उस्मानाबादला तर राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसने सोलापूरला दिले नाही मंत्रीपद
उस्मानाबाद/ विठ्ठल एडके
महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यासमवेत सहा मंत्र्यांनी शपथ घेतली होती. मात्र सोमवारी झालेल्या मंत्रीमंड

ळाच्या विस्तारात सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याला स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळ विस्तारात शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाकडून ठेंगाच दाखवण्यात आला आहे.
राज्यात ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात सोलापूर जिल्ह्यात शिवसनेचा एकही आमदार नाही. त्यामुळे सेनेने त्या ठिकाणी मंत्रीपद देण्याचा विषयच नाही. मात्र शेजारच्या उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेचा एक खासदार आणि तीन आमदार अशी संख्या असताना देखिल उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबादच्या शिवसैनीकांना कोणतेही मंत्रीपद न देता नाराजच केले आहे. 
उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम परंड्याचे आ. तानाजी सावंत विधान परिषदेवर आमदार असताना शेवटच्या तीन महिन्यासाठी कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले होते. मात्र आत्ता तर भुम-परंडा विधानसभा निवडणुकीत तानाजी सावंत मोठ्या मताधिक्याने निवडुन आलेले असताना देखिल शिवसेनेने त्यांना डावलले आहे. मंत्रीमंडळाच्या संभाव्य यादीत आ. तानाजी सावतं यांचे शेवटच्या क्षणापर्यंत नाव होते. मात्र  रात्रीत अशी कोणती सुत्रे हालली की तानाजी सावंत यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही. त्याच प्रमाणे उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आ. ज्ञानराज चौगुले हे शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. तसेच शिवसेनेच्या तिकीटावर निवडून येण्याची तीसरी वेळ आहे. त्यामुळे त्यांना देखिल मंत्रीमंडळात स्थान मिळणे अपेक्षीत होते. मात्र उस्मानाबाद जिल्ह्याला शिवसेनेच्या कोट्यातुन  मंत्रीपदासाठी ठेंगाच दाखवला आहे. 
सोलापूर जिल्ह्यात कॉंग्रेसच्या आ. प्रणिती शिंदे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र पुन्हा एकदा मुंबईतील आ. वर्षा गायकवाड यांना स्थान दिल्यांने सोलापूर जिल्ह्याला मंत्रीपदापासुन वंचितच रहावे लागले आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. बबनदादा शिंदे, संजयमामा शिंदे, आ. भारत भालके, मोहळचे आ. माने असे चार आमदार असताना देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसने मंत्रीमंडळात स्थान दिलेले नाही. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीतील प्रमुख तिन्ही पक्षांनी देखिल सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याला मंत्रीमंडळ विस्तारात ठेंगाच दाखवला आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांमधुन नाराजी व्यक्त केली जात आहे.


बाहेरचेच पालकमंत्री, विकासाला खिळ बसणार
सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील एकाही आमदारांचा महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात समावेश झाला नाही. त्यामुळे सोलापूर आणि उस्मानाबादला बाहेरचा पालकमंत्री मिळणार आहे. मंत्रीमंडळात जिल्ह्याला स्थान नसल्याने सोलापूर आणि उस्मानाबादच्या विकासाला खिळ बसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here