back to top
Sunday, December 22, 2024
Google search engine
Homeकोल्हापूरमिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे करोना रुग्णालयात रुपांतर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख...

मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे करोना रुग्णालयात रुपांतर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची माहित

मुंबई , दि. – सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे 24 करोना बाधित रुग्ण आढळून आले. याची गांभीर्याने दखल घेऊन मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे करोना रुग्णालयात रुपांतर करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण  मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.

इस्लामपूर येथे अचानकपणे वाढलेल्या करोना रुग्णांची संख्या लक्षात येताच मुंबईतील  जे.जे. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली. डॉ. पल्लवी सापळे यांनी तातडीने मिरज येथे भेट देऊन मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे तातडीने 300 खाटांच्या करोना रुग्णालयात रुपांतर केले आहे. यात पंधरा आय.सी.यू . बेड, सिटी स्कॅन एम.आर.आय. या सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. करोना तपासणीसाठी येत्या तीन ते चार दिवसात  तपासणी केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे.

मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील सर्व रेसिडेंट डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ. वाहन चालक व अन्य कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आले आहे. येत्या आठवडाभरात हे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येईल येईल असेही अमित देशमुख यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments