मराठी चित्रपट सृष्टीत एक गाजलेले पात्र आहे. तात्या विंचू नावाचे स्वतः चा जीव पूर्णपणे गेलेला असताना मृत्युंजय मंत्र म्हणून जिवंत राहण्याचा त्याचा प्रयत्न. शेवट पर्यंत तो यशस्वी होत नाही. तसेच अलीकडे समाज माध्यमात वाईट हौसात राहणाऱ्या ला देखील तात्या नावाने संबोधले जाते त्याबाबतच्या चित्रफिती बक्कळ पाहायला मिळतात. जगातील सर्वात मोठी महासत्ता सध्या अमेरिका आहे. आणि महासत्ता राहण्यासाठी सदैव प्रयत्न अमेरिका करत असते. मात्र कोरोना च्या संकटापुढे या महासत्तेने गुडघे टेकले आहेत. अमेरिकेत कोरोना बधितांची संख्या ३६८१७४ इतकी आहे तर मृतांची संख्या दहा हजारांच्या वर गेली आहे. तरी देखील या महासत्तेची खुमखुमी कायम आहे. भारतात वापरले जाणारे ने हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध कोरोना साठी उपयुक्त आहे. भारताकडे त्याचा साठा मुबलक असल्याने ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून त्याचा पुरवठा करण्याची मागणी केली भारतानेही ती लागलीच मान्य केली. यानंतर आभार व्यक्त करताना ट्रम्प यांनी जर भारताने हे औषध दिले नसते तर भारताला अमेरिकेने प्रत्युत्तर दिले असते अश्या प्रकारचे हे वक्तव्य आहे. जागतिक सत्तेच्या अनेक नाड्या हातात असल्याने अमेरिकेला ही घमेंड आली असावी. भारत आणि अमेरिकेचे व्यापारी संबंध चांगले आहेत. संबंध चांगले आहेत म्हणून धमक्या देणे बरे नव्हे. खरे तर सरकारकडून याला प्रत्युत्तर द्यायला हवे होते. जर भारत यावर गप्प राहिला तर आंतरराषट्रीय राजकारणात मोठी नाचक्की होऊ शकते. भलेही ताकदीने आपण कमी असू मात्र लाचार नाहीत हे अमेरिकेला दाखवून द्यायला हवे. चीन आणि अमेरिकेत ट्रेड वॉर नेहमीच चर्चेत राहिले आहे. कोरोना च्या बाबतीतही अमेरिका आणि चीन मध्ये तुलना होताना दिसत आहे. नवीन उत्पत्ती झालेला एखादा आजार. ज्याबद्दल कोणालाही माहिती नाही अश्या विषाणूच्या प्रसारावर चीनने नियंत्रण मिळवले मात्र विषाणू नेमका कसा आहे त्याचा धोका कितपत आहे याचे ज्ञान असतानाही अमेरिकेसारख्या देशाला त्यावर नियंत्रण मिळवता न येणे हे दुर्दैव आहे. कोरोना चा मुकाबला करण्यास अपयशी ठरलेल्या अमेरिकेने जागतिक नेतृत्व करावे की नाही हाच आता संशोधनाचा भाग आहे. संकट समयी एखादा देश त्याचा सामना कसा करतो त्यावर मोजमाप झाल्यास अमेरिका यात खूप मागे पडल्याचे दिसत आहे. एकेकाळी ब्रिटन महासत्ता होते मात्र १९५६ साली सुवेझ कालवा आपल्याकडे वाईट पद्धतीने घेतला होता त्यानंतर ब्रिटनचे महासत्ता पद गेले होते. आता अमेरिका या संकटाचा कसा सामना करणार आहे यावरून पुढची दिशा ठरणार आहे. कोरोना हे जागतिक संकट आहे. त्यासाठी सर्व देशांनी एकत्र येण्याची गरज आहे. जागतिक अर्थव्यवस्था सुस्थित ठेवण्याचे आव्हान सगळ्यांसमोर आहे. अश्या परिस्थितीत एका विकसनशील देशाला डीवचने त्याला धमकीवजा इशारा देणे अमेरिकेसारख्या देशाला शोभणारे नाही. येत्या काही महिन्यात अमेरिकेत निवडणुका होणार आहेत. ट्रम्प त्याचे दावेदार मानले जातात मात्र संकटाचा सामना करण्याऐवजी धमक्या देत ते बसले तर परिणाम वेगळे दिसू शकतात तूर्तास अमेरिकेने आपली शक्ती संकटाचा सामना करण्यासाठी खर्च करावी एवढेच