तासगाव ( राहुल कांबळे) : आज जगभरात कोरोना रोग थैमान घालत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने घातलेले निर्बंध पाळा,संचारबंदी, कलम१४४ चे पालन करा असे आवाहन तासगावचे पोलीस उपविभागीय अधिकारी अंकुश इंगळे यांनी केले आहे.
आज सोशल डिस्टंन्सींगचे पालन करीत तासगाव पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची मिटिंग आयोजित केली होती. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी अंकुश इंगळे यांनी कमिटी मिटिंगमध्ये १४ एप्रिल डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती बाबत तासगावकरांना मार्गदर्शन करीत कायदा आणि सुव्यवस्था राखा जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. या कोरोनोला रोखण्यासाठी प्रशासनाने घातलेले निर्बंध पाळा, संचारबंदी, कलम १४४ चे पालन करा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करताना महाभयंकर कोरोना फैलावणार नाही याची दक्षता घेत नागरिकांनी घरातुन बाहेर पडु नये.आपल्या घरीच महामानवाला अभिवादन करा. आरोग्य प्रशासन आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन केले. यावेळी तासगाव चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेद्र सावंत्रे,
सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक विठ्ठल शेळके, श्री विश्राम मदने, श्री रत्नदिप साळोखे, पोलिस हवालदार श्री वंडे दादा,सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.