धाराशिव – जिल्हयात दिनांक 16 जून 2023 रोजी म उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांचा धाराशिव जिल्हा दौरा नियोजित आहे. दिनांक 16 जून 2023 ते दिनांक 21 जून 2023 या कालावधीत श्री गजानन महाराज पालखी शेगाव, ता. शेगाव जि. बुलढाणा ही उस्मानाबाद जिल्हयातून आषाढीवारी करीता श्रीक्षेत्र पंढरपूर जि.सोलापूर कडे मार्गस्त होणार आहे. दिनांक 19 जून 2023 ते दिनांक 21 जून 2023 या कालावधीत श्री संत एकनाथ महाराज पालखी पैठण जि. औरंगाबाद ही उस्मानाबाद जिल्हयातुन आषाढीवारी करीता श्रीक्षेत्र पंढरपुर जि. सोलापूर कडे मार्गस्त होणार आहे. दिनांक 16 जून 2023 ते दिनांक 28 जून 2023 या कालावधीत विविध संतांच्या पालख्या दिंडया हया उस्मानाबाद जिल्हयातुन आषाढीवारी करीता श्रीक्षेत्र पंढरपूर जि. सोलापूर कडे मार्गस्त होणार आहे. मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी विविध पक्ष/संघटना यांचे कडुन आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिनांक 29 जून 2023 रोजी देवशयानी एकादशी ( आषाडी एकादशी) साजरी होणार आहे. दिनांक 29 जून 2023 रोजी ईद-उल-अझहा (बकरी ईद ) साजरी होणार आहे. मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी विविध पक्ष/संघटना यांचे कडुन आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिकविमा व नुकसान भरपाईची देय रक्कम मिळावी आणि इतर मागण्या च्या अनुषंगाने शेतकरी तसेच विविध पक्ष/संघटना यांचे कडुन धरणे, मोर्चे, उपोषण, आत्मदहन, बंद, निदर्शने, तालाठोको व रास्तारोको इत्यादी प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उस्मानाबाद जिल्हयात ग्रामीण / शहरी भागात विविध ठिकाणी यात्रा / जत्रा / ऊरुस लहान मोठया स्वरुपात साजरे करण्यात येतात. व्यक्ती, व्यक्ती समुह तसेच विविध पक्ष/संघटना यांचे वतीने त्यांच्या विविध मागण्यासाठी अचानकपणे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी वरील प्रमाणे संपन्न होणारे धार्मिक सण / उत्सव, यात्रा / जत्रा / ऊरुस व आंदोलनात्मक कार्यक्रम उस्मानाबाद जिल्हयात शांततेत पार पाडण्याकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उस्मानाबाद जिल्हयात दिनांक 16 जून 2023 रोजीचे 00.01 पासुन ते दिनांक 30 जून 2023 रोजी 24.00 वाजे पावेतो (दोन्ही दिवस धरुन) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे जमाव व शस्त्रबंदी प्रमाणे खालील बाबी करण्यास मनाई करण्यात येत आहे.
1. शस्त्र, सोटे, काठी, तलवार, बंदूक जवळ बाळगणार नाहीत. 2. लाठया, काठया, शारिरीक इजा होण्यास कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील, अशा वस्तु बाळगणार नाहीत. 3. कोणतेही दाहक पदार्थ, किंवा स्फोटके जवळ बाळगणार नाहीत.
4. दगड किंवा इतर क्षेत्रपणास्त्रे किंवा फोडवयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधे गोळे करुन ठेवणार नाहीत किंवा बाळगणार नाहीत किंवा तयार करणार नाहीत.
5. आवेशी भाषणे, अंगविक्षेपण, विडंबनात्मक नकला करणार नाही सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक किंवा इतर कोणत्याही वस्तु जवळ बाळगणार नाहीत.
6. जाहिरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने वाद्य वाजविणे किंवा कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मुल्यांच्या विरुध्द असेल किंवा देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहचवणारी असेल किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहचवणारी असेल आणि जाहिरपणे प्रक्षोभक भाषण व असभ्य वर्तन करणार नाहीत. 7. व्यक्तींच्या किंवा शवांच्या किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणार नाहीत.
8. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणुक / मोर्चा काढता येणार नाही