तासगाव प्रतिनिधी दि.(राहुल कांबळे)
तासगाव शहरात लॉक डाऊन सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. सध्या शहरांमध्ये नागरिक व व्यापार यांच्या वतीने लॉक डाऊन ची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे होत आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार हॉटेल, शाकाहारी व मांसाहारी खानावळी, वडापाव सेंटर, ज्युस सेंटर संपूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे शहरातील डुकरांना कोणतेही खराब खरकटे पदार्थ खाण्यासाठी मिळत नाहीत त्यामुळे सदरची शेकडो मोकाट डुकरे शहरात मुक्तपणे फिरताना दिसत आहेत ती नुसती फिरत नसून ती लोकवस्तीत काय खाण्यासाठी मिळत आहेत का यासाठी भटकत आहेत. नागरिकांच्या कडून त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला तर नागरिकांच्या अंगावर जात आहेत अशी सध्या अवस्था आहे. सध्या विटा नाका एसटी स्टँड चौक पागागल्ली, सांगली नाका, भिलवडी नाका, काशीपुरा गल्ली, तासगाव पोलीस लाईन, पटवर्धन मळा,येथे मोकाट डुकरांचा अक्षरशा धुमाकूळ मांडला आहे. यापूर्वी शहरातील हॉटेल, शाकाहारी व मांसाहारी खानावळ व ज्यूस सेंटर सुरू असताना राहिलेल्या शिल्लक अन्न व खरकाटे डुकरांच्या मालक गोळा करत व त्यांच्या दुकानात खायला घालत होते सध्या त्यांना ते मिळत नसल्यामुळे डुक्कर मालकांनी आपली डुकरे मोकाटपणे लोकवस्ती सोडून दिलेले आहेत मध्यंतरी सामन्यापूर्वी मोकाट डुकरांचा हा मुद्दा तासगाव शहरातील पत्रकार बांधवांनी लावून धरला होता परंतु नगरपालिकेतील सत्ताधारी एका बड्या नेत्यांच्या संपर्कात असलेल्या डुकरांच्या मालकाने सर्व डुकरे पकडून घेऊन जात असताना राजकीय वजन वापरून सदरची सर्व मोकाट डुकरे सोडण्यास भाग पाडले होते. त्याचा गंभीर परिणाम म्हणून सध्या सर्वच भागांमध्ये रहिवाशी वस्तीत सर चे मोकाट फिरत आहेत व नागरिकांना त्रास देत आहेत. नागरिकांच्या दारामध्ये विस्टा टाकत आहेत. यासंदर्भात आज पागा गल्ली तासगाव येथील संतप्त नागरिकांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध न झाल्याने प्रभारी आरोग्य अधिकारी प्रताप घाडगे यांना सदरचे निवेदन देण्यात आले तरी या भागातील नगरसेवकांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. तसेच एक आठवड्यामध्ये सदर मोकाट डुकरांचा बंदोबस्त झाला नाही तर या भागातील सर्व नागरिक नगरपालिका समोर उपोषणास बसणार आहेत. याप्रकरणी तासगाव येथील काही पत्रकारांनी प्रभारी आरोग्य अधिकारी श्री प्रताप घाडगे यांची भेट घेतली असता यासंदर्भात आम्ही प्रशासनाच्यावतीने तातडीने पाऊले उचलून कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत तर नगरसेवक ऍड बाळासाहेब गुजर यांनी या मोकाटपणे लोकवस्तीत डुकरे फिरणाऱ्या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन निवेदन देणाऱ्या व उपस्थित पत्रकार बांधवांना दिले आहे. सर्वात महत्त्वाचे या सर्व डुक्कर मालका पैकी एक बहादर आपली राजकीय ताकद पुन्हा वापरण्याची शक्यता आहे.त्याने जर तसे करण्याचा प्रयत्न केला तर नगरपालिकेने सदरच्या त्या व्यक्तीवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची ही मागणी संतप्त नागरिक यांच्याकडून होत आहे.
तासगाव शहरातील मोकाट डुकरांचा तातडीने बंदोबस्त करण्याची आक्रमक मागणी; पागा गल्ली येथील नागरिकांनी दिले मुख्याधिकार्यांना निवेदन
RELATED ARTICLES