सलगरा दिवटी येथे प्रतिबंधित क्षेत्रात मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप

0
121

सलगरा :-  कोविड 19 या विषाणूचे संक्रमित ४ पॉजिटिव रुग्ण सलगरा (दिवटी.) येथे आढळून आल्याने तुळजापूर विधानसभा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्फत त्यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत सदस्य प्रशांत लोमटे  यांच्या पुढाकाराने प्रतिबंधित क्षेत्रात जनतेच्या  हितासाठी, निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असे मास्क , सॅनिटायझर , आर्सेनिक अल्बम ३० या रोगप्रतिकारक शक्तिवर्धक गोळ्यांचे वाटप करण्यात आले , तसेच या गोळ्या खाण्याचे नियम अटी यांचे सुध्दा मार्गदर्शन करण्यात आले . याप्रसंगी प्रशांत भुजंग मुळे , अनिल लोमटे  , बळवंत गरड , स्वयंसेवक योगेश कुठार , मारुती मोरे ,आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here