- प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वाहन ड्रायव्हर, चॅनल कॅमेरामन, राजकीय पक्षाचा अध्यक्षासह बँकेचे संचालकांचा समावेश)
- पंढरपुरकरांना काळजी घेण्याची आवश्यकता)
पंढरपूर (प्रतिनिधी):-
पंढरपुरातील त्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील आणखी सात जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह वाल्याने पंढरपूरकरांना काळजी घेण्याची आवश्यकता असून आषाढी एकादशीचा महापूजेला अवघे काही तास उरले असताना पंढरपूरात नव्याने सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान त्या रुग्णांची तपासणी करणारे पंढरपूरच्या तहसीलदार डॉक्टर वैशाली वाघमारे यांचा अहवाल मात्र निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. पंढरपूरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता नऊ झाली आहे तर शहर व तालुक्यातील मिळून एकूण संख्या १७ आहे.
मात्र प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहन ड्रायव्हरचा समावेश असल्याने चिंता वाढली आहे. यामध्ये मुंबईहून चित्रीकरण करण्यासाठी आलेला एका चॅनल कॅमेरामन चा समावेश असल्याचे समजते. पंढरपुरातील एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षासह सहकारी बँकांच्या संचालक मंडळातील पाच जणांना समावेश आहे या सर्वांचे काल स्वॅप घेण्यात आले होते.
त्यातील अहवाल आल्यानंतर हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे . सुदैवाने या पाचही जणांना सध्या प्रशासनाने विलगीकरण कक्षात ठेवले असल्याची माहिती समोर येतेय. दरम्यान पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे असून गरज असेल तरच बाहेर पडावे, तोंडाला मास्क लावावा,सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टंसिंग पाळा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.