तासगावातील राज्य मार्ग वरील हॉस्पिटलमधील पाच कर्मचारी पॉझिटिव्ह

0
108

  • वाघापूर येथील अॅडमिट महिलेच्या संपर्कातून लागण  अर्धे तासगाव सिल होण्याची शक्यता शहरात  प्रंचड खळबळ

तासगाव प्रतिनिधी/राहुल कांबळे

     तालुक्यातील वाघापूर येथील एका २२ वर्षीय महिलेला दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तत्पूर्वी तिच्यावर सावळज व तासगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तिच्या संपर्कातून तासगाव येथील ‘त्या’ हॉस्पिटलमधील पाच कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर सावळज व तासगाव येथील हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.
     याबाबत माहिती अशी, पनवेलमधून आलेले   आमणापूर (ता. पलूस) येथे क्वारंटाईन झाले होते. क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर ६ जणांपैकी मूळची वाघापूर येथील २२ वर्षीय एक महिला आपल्या गावाकडे (वाघापुरला) आली. त्याठिकाणी तिला अंगदुखी व कणकण जाणवू लागल्याने प्रथम तिला सावळज येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्याठिकाणी तिला गूण न आल्याने नंतर तिला तासगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

     उपचारादरम्यान तिला कोरोनाची लक्षणं जाणवू लागल्याने तिचा स्त्राव तपासण्यासाठी घेण्यात आला होता. तपासणीनंतर तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामळे आमणापूर, वाघापूर, सावळज व तासगाव येथे खळबळ उडाली.

     यानंतर बाधित महिलेच्या दसंपर्कातील ३० जणांचे स्त्राव तपासण्यासाठी घेण्यात आले होते. याशिवाय राजापूर येथील बाधित पुरुषाच्या संपर्कातील लोकांचेही स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले. तसेच तालुक्यातील अन्य काही लोकांचेही स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले होते. कालपासून संबंधित लोकांचे अहवाल प्रलंबित होते.
      त्यातील ५५ लोकांचे अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाले. पैकी 50 लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. तर तासगाव येथील ‘त्या’ दवाखान्यातील  पाच कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल सूर्यवंशी यांनी दिली.
      दरम्यान, तासगाव येथील ‘ते’ हॉस्पिटल सील करण्यात आले आहे. तर पॉझिटिव्ह आलेल्या पाच पैकी ब्रदर व सिस्टर यांना मंगळवारीच संध्याकाळी  मिरज येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे: तर इतर तिन कर्मचारी कोण आहेत याची माहिती प्रशासनाकडून लवकरच प्राप्त होईल..काल संध्याकाळी हॉस्पिटल मधून दोन जणांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.. एकूणच तासगाव शहरात एकाच वेळी पाच कोऱना बाधित रुग्ण आढळल्याने तेंही बाहेरून आलेल्या व्यक्तीमुळे संपूर्ण तासगावकरांना त्रास सहन करावा लागणार आहे. कारण पाचजणांमुळे निम्मे तासगाव सिल होण्याची शक्यता आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here