back to top
Thursday, November 21, 2024
Google search engine
Homeमहाराष्ट्रपंढरी पोलिसांच्या रखवालीतून आरोपीचे पलायन

पंढरी पोलिसांच्या रखवालीतून आरोपीचे पलायन

  • खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी;उपचारासाठी नेले असता घडला प्रकार

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर शहरातील पोलिसांच्या रखवालीत  असलेला आरोपीस  उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालय येथे दाखल केले  होते. आरोपीने पहाटे शौचालयाला जाण्याच्या बहाण्याने शौचालयाच्या खिडकीतून पलायन केले संबंधित आरोपी हा स्वतःच्या पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली सबजेल मध्ये होता. सदरची घटना घडतात शहरात एकच खळबळ उडाली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथील आरोपी शिवाजी नाथाजी भोसले (वय५५) त्याने शनिवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास छातीमध्ये दुखत असल्याचे कारण सांगितलेने त्यास उपचारासाठी सामान्य रुग्णालय येथे नेण्यात आले त्याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू होते पहाटे सहा ते सव्वा सहाच्या सुमारास आरोपी शिवाजी भोसले याने शौचालय व बाथरूमला जाण्याचा बहाणा करून शौचालयात गेला त्याठिकाणी असलेल्या खिडकीच्या काचा त्याने काढून बाजूला ठेवल्या व खिडकीतून बाहेर आला आजूबाजूला कोणीही नसल्याचे पाहून उपचाराच्या ठिकाणी असलेल्या कंपाऊंड भिंतीवरून उडी मारून परिसरात उगवलेल्या झाडाझुडपात अंधाराचा फायदा घेवून पळून गेल्याने गोंधळ उडाला यावेळी ड्युटीवर असलेल्या पोलिसांना शंका आल्याने त्यांनी शौचालयाचे दार वाजवले व बाहेर जाऊन पाहतात तो काय आरोपी पळून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले एखाद्या सिनेमातील दृश्य प्रमाणे सदरच्या आरोपीने नियोजनबद्ध पलायन केल्याचा प्रसंग निर्माण झाल्याचे दिसत असले तरीही हा आरोपी खुनाच्या गुन्ह्यातील असल्याने पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. आरोपी शिवाजी भोसले याच्यावर गुन्हा र. नं. ३८०२०१६  मध्ये स्वतःच्या पत्नीचा कोयत्याने गळा चिरून खून केल्याच्या आरोपाखाली भादवी कलम ३०२ नुसार सबजेलमध्ये होता. मात्र पोलिसांच्या कायदेशीर रखवालीतून पळून गेल्याने पोलीस त्याचा कसोशीने शोध घेत आहेत. या घटनेची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सुजित जाधव यांनी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये दिली असून त्याचा गुन्हा र. नं. ५७४२० भादवी कलम २२४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत असून हा आरोपी कोणाला दिसल्यास ताबडतोब नजीकच्या पोलीस स्टेशनची संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments