पार्थ पवारांना आजोबांनी फटकारलं मात्र आजोळची भक्कम साथ

0
86

उस्मानाबाद – महाराष्ट्रात ज्येष्ठ नेतृत्व आणि तरुण नेतृत्व यांच्यात घर्षणाचा काळ सुरू आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सी.बी.आय. चौकशीची मागणी करणारे पार्थ पवार यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि आजोबा शरद पवार यांनी इममॅच्युअर म्हणता फटकारले आणि त्यांच्या वक्तव्याला कवडीचीही किंमत नसल्याचे सांगत वेगळ्याच चर्चेला तोंड फोडले आहे.मात्र पार्थ पवार यांच्या आजोळच्या मंडळीनी मात्र पाठराखण केली आहे. भाजपचे युवा नेते आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी फेसबुक वर पोस्ट लिहीत पार्थ पवार यांचे समर्थन केले आहे.

ही आहे पोस्ट

“तुम्ही जन्मजात लढ्वय्या आहात हे मी लहानपणापासून पहात आलोय.मला तुमचा अभिमान आहे. आपण उस्मानाबादचे आहोत कसं लढायचे ते चांगले ठाऊक आहे”.

यातून राजकीय संकेत नाहीत

मल्हार पाटील यांनी केलेली पोस्ट कोणतेही राजकीय संकेत दर्शविण्यासाठी नसून त्यांची आजोळाची मंडळी त्यांच्यामागे भक्कमपणे उभी आहे हे सांगण्यासाठी असल्याचे मल्हार पाटील यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

जवळचे नातेसंबंध

पार्थ पवार यांचे वडील अजित पवार आणि मल्हार पाटील यांचे आजोबा डॉ. पद्मसिंह पाटील हे नात्याने मेव्हणे आहेत. आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे पार्थ पवार यांचे आजोळ आहे. पार्थ पवार यांच्या भूमिकेला सर्वात आधी आजोळातून सर्वप्रथम समर्थन मिळत असल्याने चर्चेला उधाण आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here