तेर प्रतिनिधी
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील 65 वर्षीय वृध्द इसमाचा गुरुवारी कोरोना संसर्गाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला असला तरी आता पर्यंत कोरोना पाँझिटीव्ह रूग्णाची संख्या 34 वर गेली आहे
तेर येथील 65 वर्षीय वृद्ध इसमाचा 3 आँगस्ट रोजी कोरोना पाँझिटीव्ह अहवाल आला होता उपचारादरम्यान या रूग्णाची प्रकृती चिंताजनक बनली होती अखेर गुरुवार दि.13 रोजी उस्मानाबाद येथे मृत्यू झाला
दरम्यान 1 आँगस्ट रोजी कोरोना पाँझिटीव्ह रूग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना महामारीचा फैलाव सुरू झाल्यापासून तेर येथील 32 रूग्णाची नोंद झाली आहे 2 रूग्ण तेरचे रहिवासी असले तरी ते सध्या उस्मानाबादेत वास्तव्य करून असल्याने तेर ची कोरोना रूग्णाची संख्या 34 वर गेली आहे
तेरमध्ये वृध्द कोरोनाचा बळी ;एकाला डिस्चार्ज संख्या 34 वर
RELATED ARTICLES