परंडा(दत्ता नरुटे) परंडा तालुक्यातील सर्वात मोठे (5tmc)समजले जाणारे सीना कोळगाव धरण बुधवार दि 14 रोजी अखेर पूर्ण क्षमतेने भरले असून आज सकाळी दोन टप्प्यात धरणाचे 4 दरवाजातून सीना नदीत पाणी सोडण्यात आले असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
सीना कोळगाव धरणात नगर जिल्ह्यातील पाणी येते गेल्या महिनाभर नगर जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसत आहे त्यामुळे सीना नदीवरील नगर जिल्ह्यातील धरणे गेल्या महिन्यापूर्वीच ओव्हरफ्लो झाल्याने सीना कोळगाव धरण भरण्याचे आशा पल्लवित झाल्या होत्या अखेर आज धारण 100 टक्के भरले असून यातून खाली पाणी सोडण्यात आले आहे त्यामुळे परंडा ,करमाळा, माढा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आंनदाचे वातावरण आहे गेल्या दोन वर्षात हे धरण भरले नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता
13हजार हेक्टर होणार बागायती
सीना कोळगाव धरणतुन परंडा तालुक्यातील 8700 हेक्टर तर करमाळा तालुक्यातील3400 हेक्टर असे लागवडीलायक क्षेत्र 13000 च्या आसपास सिंचित होणार असून याचा फायदा दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे
धरण भरले पण नियोजनाचे काय?
सीना कोळगाव धरण यावर्षी पूर्ण क्षमतेने भरले आहे परंतु त्या पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे धरणातून विविध ठिकाणी पाणी सोडवे लागते यामध्ये परंडा तालुक्यातील आनाळा,करमाळा तालुक्यातील नेर्ले साठवण तलावात पाणी सोडण्याची मागणी होत आहे त्यामुळे प्रशासनाने वाया जाणारे पाणी या ठिकाणी सोडावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे