back to top
Thursday, January 2, 2025
Google search engine
Homeमहाराष्ट्रतासगाव शहरला मुसळधार पावसाने झोडपल्याने अनेक नागरिकांचे पुराच्या पाण्याने लाखो रुपयांचे...

तासगाव शहरला मुसळधार पावसाने झोडपल्याने अनेक नागरिकांचे पुराच्या पाण्याने लाखो रुपयांचे नुकसान

साठेनगर परिसराला फटका गरीब नागरिकांचे संसार उघड्यावर प्रशासनाने तातडीने मदत करण्याची नागरिकांची मागणी

राहुल कांबळे/तासगाव

तासगाव शहर व तालुक्यातील तालुक्याला गेले  चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडल्याने त्यातच बुधवारी सकाळी सहा वाजता सुरू झालेला पाऊस गुरुवारी सकाळी सहा वाजेपर्यंत थांबला नाही २४ तास सतत पाऊस पडल्याने तासगाव शहरातील अनेक घरांमध्ये दुकान मध्ये पावसाचे पाणी घुसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे त्यातच गेल्या चाळीस ते पन्नास वर्षात कापून त्याला कधीही एवढा महापूर आला नाही तो आज महापूर आल्याने ओढ्यालगत अनेक नागरिकांच्या संसार पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत कारण पूर्वी लोंढे तलाव भरला तरच का पूर आला पाणी येत असे परंतु यावर्षी चांगला पाऊस झाल्याने दोन महिन्यापूर्वीच तलाव पूर्ण क्षमतेने भरला असल्याने  मुसळधार पाऊस पडल्याने  प्रथमच अनेक वर्षात कापूर ओढ्याला महापूर पाहावयास मिळाला आहे. तासगाव शहरातील वरचे गल्ली भागातील साठे नगर परिसर येतो हा शहरातील शेवटचा टोक असल्याने आजूबाजूला शेती असल्याने हे पुराचे पाणी रात्री दोन वाजता येतील रहिवासी परिसरात राहणाऱ्या पाच ते सहा घरात शिरले तेथील घरे ही साधी व मातीची असल्याने दोन ते तीन घरे पुराच्या पाण्याने जमीनदोस्त झाली परंतु यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही सतर्क नागरिकांनी तेथील नागरिकांना बाहेर काढले यामध्ये शीला विष्णू वाघमारे यांच्या म्हशीचे दोन रेडके वाचवण्यात यश आले तर एक म्हैस पुराच्या पाण्यात वाहून गेली घर पडल्याने व म्हैस वाहून गेल्याने शीला वाघमारे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले तर अंतराम मोरे यांचे घर कापूर ओढ्यातील पात्रालगतअसल्याने पुराचे पाणी पंधरा ते वीस फूट पाणी आल्याने ४०० कडबा  पुराच्या पाण्यात वाहून गेला तर सहा धान्याची पोती पुराच्या पाण्याने भिजून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.तसेच अंताराम मोरे,शहाजी देवकुळे, इंदाबाई रास्ते, दौलत देवकुळे, तानाजी देवकुळे, रमेश देवकुळे,प्रकाश देवकुळे, सुधाकर वाघमारे, पद्मिनी देवकुळे यांच्या पैकी कोणाची तरी घराची भिंत पडली आहे तर कोणाचे छपराच्या घरांचे नुकसान झाले येथील काही कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना फोन केला असता नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील प्रभारी आरोग्य अधिकारी प्रताप घाडगे , आयुब मनेर यांनी साठे नगर येथे धाव घेतली व तेथे प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली तर स्थानिक नगरसेवक सुभाष देवकुळे यांनी कोणतीही मदत न करता पाऊस पडला आहे नुकसान होणारच, पावसापुढे आपल काय चालतंय का,अस होणारच  असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने येथील माता-भगिनींच्या रोषाला नगरसेवक सुभाष देवकुळे यांना सामोरे जावे लागले, मत मागायला पुन्हा दारातच येऊ देत बघतोच असे तेथील नागरिक व्यक्त करीत होते.नगरपालिका प्रशासन व देवकुळे यांच्यावर तिथल्या नागरिकांना आपला राग व्यक्त केला आहे परंतु साठे नगर भागातील मतदारांनी एक तर्फी निवडून दिलेल्या तासगाव नगरीचे प्रथम नागरिक डॉक्टर विजय सावंत यांनी मात्र या गरीब साठेनगर कडे साधे फिरकले नाहीत किंवा त्यांच्या नुकसानीची कोणतीही चौकशी केली नाही हे विशेष आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या सौ मनीषा म्हस्के,राजू म्हस्के, सामाजिक कार्यकर्त्या सौ.दिपाली पुंडेकर  यानी सकाळी सहा वाजताच साठे नगर येथे जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून माता-भगिनींना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.सकाळी आठ वाजता राष्ट्रवादीचे गटनेते नगरसेवक बाळासाहेब सावंत यांना साठे नगर येथे झालेल्या नुकसानीची माहिती समजताच शहर युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष खंडू कदम व युवानेते अभिजीत पाटील यांना सोबत घेऊन साठे नगर येथे धाव घेत तेथील नुकसानीची पाहणी केली व तेथील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला तरी सकाळी सात वाजता तिचा जागर न्यूज चॅनेल चे तासगाव तालुका प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून नागरिकांच्या समस्या आपल्या कॅमेरामध्ये टिपण्याचे काम केले तर वस्तुस्थिती नगरपालिका प्रशासनाच्या समोर आणण्याचे काम केले आहे.येथील साठे नगर परिसरातील सर्व नागरिक मोलमजुरी करणारे आहेत त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घर बांधण्यासाठी चे प्रस्ताव तासगाव नगरपालिका दाखल केलेले आहेत त्या प्रस्ताव अनेक प्रस्ताव हे पेंडिंग आहेत परंतु त्यापैकी बोटावर मोजण्याएवढे प्रस्ताव मंजूर आहेत पण त्यापैकी काही हातावर हाताच्या बोटावर मोजण्याइतपत प्रस्ताव मंजूर असून त्यापैकी काही हप्ते न मिळाल्यामुळे  घरे अर्धवट स्थितीत आहेत. आज  कापूर ओढ्याला आलेल्या पुरामुळे व इतर सर्व घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांची तातडीने सर्वेक्षण करून नगरपालिकेच्या वतीने पंतप्रधान घरकुल योजनेतून सदरच्या सर्व नागरिकांचे तातडीने प्रस्ताव मंजूर करून त्यांचे संसार उभा करण्याची गरज आहे. यासाठी गट तट  न पाहता सत्ताधारी व विरोधक नगरसेवकांनी एकत्र येऊन साठे नगर येथील गरीब नागरिकांचे घरे बांधून पुन्हा संसार उभा करण्याची पूण्य करावे अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत अन्यथा नगरपालिके समोर घरकुल मंजूर होईपर्यंत उपोषण करण्याची आणि माघार न घेण्याची जणू शपथच येथील नागरिक व्यक्त करीत होते.यावेळी माजी नगरसेवक महाकू मोरे, मधुकर देवकुळे, प्रकाश देवकुळे इ. उपस्थित होते.दुपारी खासदार संजय काका पाटील यांच्या आदेशाने ज्या नागरिकांची घराचे नुकसान झाले होते. ज्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. त्या नागरिकांना दुपारच्या जेवणाची व्यवस्था व शिक्षण मंडळाच्या शाळेत राहण्याची व्यवस्था नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी पुढाकार घेऊन प्रशासनाच्या वतीने केली होती हे विशेष होय. यावेळी प्रभारी आरोग्य अधिकारी प्रताप घाडगे,आयुब मनेर,महादेव लुगडे ,राजू माळी, राजू काळे इ. नी नुकसानग्रस्त नागरिकांचे योग्य नियोजन केले होते. सर्वात महत्त्वाचेतासगाव नगरपालिका मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी तातडीने लक्ष घालून या भागातील सर्व नागरिकांचा पुन्हा सर्वे करून पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकुल प्रस्ताव दाखल करून घेण्यात यावेत व पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर करून द्यावीत व सदरच्या नागरिकांना शासनाचा योजनेचा फायदा करून द्यावा अशी मागणी होत आहे. हे लवकरात लवकर नाही झाले तर साठेनगर मधील नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत असे म्हटले तर वावगे ठरू नये.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments