राहुल कांबळे/ तासगाव प्रतिनिधी
सांगली जिल्हा पोलीस अधिक्षक श्री दिक्षितकुमार गेडाम व अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांचे मार्गदर्शनाखाली अश्विनी शेंडगे उपविभागीय पोलीस अधिकारी तासगांव विभाग,पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी नवरात्र/दुर्गामाता उत्सवचे अनुशंगाणे तासगांव शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता सकाळी.१०.३० ते ११.४० वा पर्यंत छ.शिवाजी महाराज पुतळा,एस.टी.स्टॅण्ड चौक, गणपती मंदिर सिध्देश्वर चौक, सराफ कटटा, बागवान चौक, मुस्लिम मोहल्ला , माळी गल्ली, विटा नाका, चिंचणी नाका, खाटीक गल्ली,बागवान चौक, बागणे चौक,वंदेमातरम चौक,सिध्देश्वर मंदिर,गणपती मंदिर,शनी मंदिर, छ.शिवाजी महाराज पुतळा असा रुट मार्च घेण्यात आलास रूट मार्चकरिता तासगांव पोलीस ठाणेकडील ४ अधिकारी व २७ कर्मचारी व ३० होमगार्ड तसेच पोलीस मुख्यालयाकडील दंगल नियंत्रण पथकाचे ९ कर्मचारी उपस्थित होते.सदर रुटमार्च दरम्यान उपविभागीय अधिकारी तासगांव अश्विनी शेंडगे यांनी गणपती मंदीर येथे रुटमार्च मधील सर्व अधिकारी व कर्मचारी ब्रिफींग करतांना नवरात्र सण व उत्सब दरम्यान बंदोबरतसाटी जावे लागते कोविड-१९ चे अनुषंगाने स्वत:ची काळजी घेण्यात तसेच बंदोबस्त चोख करण्यासंदर्भात सुचना देण्यात आल्या.नवरात्र/दुर्गामाता उत्सब चे अनुशंगाणे शासनाने निर्गमित केलेले नियमावली प्रमाणे/नियमास अधिन राहून सण साजरा करणेबाबत तसेच योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणेबाबत योग्य त्या सूचना दिल्या आहेत.