उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी; त्यांचे अश्रू पुसण्यासाठी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज व उद्या दोन दिवसाच्या उस्मानाबाद जिल्ह्या दौऱ्यावर येत आहेत.
खा.शरद पवार यांनी कालच उस्मानाबाद जिल्हा दौरा केला आहे. परंतु त्यांनी शेतकऱ्यांना मदत करणेबाबत ठोस असे कोणतेही व्यक्तव्य केलेले नाही. त्याच्या दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी ना.फडणवीस कोणती आक्रमक भूमिका घेतात याबाबत जिल्हावासीयांत उत्सुकता लागली आहे.दरम्यान देवेंद्र फडणवीस हे उस्मानाबाद येथे मुक्कामी असणार असून जेष्ठ नेते डॉ. पद्मसिंहजी पाटील यांच्या शिंगोली येथील निवासस्थानी मुक्कामी राहणार आहेत हे विशेष! त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे पण असणार आहेत. तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेली परिस्थिती निदर्शनास आणून तातडीने मदत करावी यासाठी मुख्यमंत्री ना.ठाकरे यांच्याकडे दोन वेळेस आग्रही मागणी केली. परंतु त्यांनी अजूनही कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. तसेच खा.पवार साहेब यांनी जिल्हा दौऱ्यावर करूनही मदत जाहीर केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व आशा फोल ठरल्या आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्या भूमिकेवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या अनुषंगाने डॉ. पाटील यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये सरकार विरोधात काय ‘खलबते’ होतात याबाबत उत्सुकता लागली आहे.