सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे ऊस दरप्रश्नी वंचित बहुजन आघाडीचे धरणे

0
90

 शेतकरी संघटनांची विश्वासहर्ता संपल्याचा जाहीर आरोप

   तासगाव प्रतिनिधी दि.२०

   वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने ऊसाला एकरकमी ३५०० रु. एफ.आर.पी.  देण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.     उसाला एकरकमी ३५०० रु. दर जाहीर करावा, मागील थकबाकीदारक साखर कारखान्यांना यंदा गाळपास  परवानगी देऊ नये, ऊस नियंत्रण आदेशांची शासन व प्रशासनाने योग्यरित्या अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांना ऊसबिले १४ दिवसात देण्यात यावी, उसाला ३५०० रु. दर देताना साखरेचे भाव वाढणार नाहीत यासाठी योग्य ती उपाययोजना करावी, तसेच मागील आठवड्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाचे पंचनामे करून तात्काळ भरपाई द्यावी या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले, यावेळी साखर सहसंचालक कोल्हापूर यांच्या प्रतिनिधींनी आंदोलस्थळी भेट घेत सदर मागण्या पूर्ण करणेबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन देत आंदोलन स्थगितीची विनंती केली.    सदर मागण्या मान्य न झाल्यास पुढील महिन्यापासून सर्व साखर कारखान्यांसमोर बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याचा इशारा युवक जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे यांनी दिला.  

शेतकरी संघटनांची विश्वासार्हता संपलेली आहे

     पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी संघटना अनेक वर्षांपासून ऊस दरावरून आंदोलने करत आहेत मात्र अलीकडच्या काळात ऊस प्रश्नावरून राजकीय संधीसाधूपणा करत राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न शेतकरी नेते करत असल्याने आज शेतकऱ्यांच्या मनात शेतकरी संघटनांच्या बाबतीत विश्वासार्हता राहिलेली नाही असा आरोप जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे यांनी केला तसेच या जगाचा पोशिंदा शेतकरी स्वाभिमानाने जगलाच पाहिजे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी प्रश्नावर सक्षम पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी काम करेल असेही गायगवाळे यांनी सांगितले.  

अटीशर्थी मान्य केल्याशिवाय मोळीपूजनास परवानगी देऊ नका-   ऊस दर प्रश्नावर ऊस नियंत्रण आदेशाचे पालन करण्याच्या अटी व शर्थीं सर्व साखर कारखान्यांना बंधनकारक केलेशिवाय प्रशासनाने मोळी पूजनास परवानगी देऊ नये व सदरचे करार हे कागदावरच न ठेवता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रशासनाने करावी अशी मागणी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष प्रशांत कदम यांनी केली. 

     यावेळी किरण कांबळे, विशाल कुरणे, रोहन धुमाळे, डॉ. राजेश साठे, निखिल कांबळे, अमित बनसोडे, सागर आठवले यांसह जिल्ह्यातील युवक आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here