सोलापूर दि.०३(प्रतिनिधी) कुर्डूवाडी(ता.माढा) येथील पत्रकार बाबाफरीद पठाण यांनी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून अविरतपणे सेवा बजावली या कार्याची दखल घेत बहुजन समाज परिषद महाराष्ट्र राज्य संचलित जोशाबा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष दिलीप देवकुळे यांच्या अध्यक्षतेखाली व विद्युत अभियंता युवराज मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला
कुर्डूवाडी येथील कै.विठ्ठलराव शिंदे सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात सन्मानपत्र शाल फेटा,पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले
यावेळी संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब देवकुळे,आबासाहेब खंडाळे,सुनील देवकर राणेश्वर हानवते,अंकुश गोरवे,आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले गेल्या अडीच वर्षापासून ते वृत्तलेखन करीत आहे सध्या ते विधी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकत आहेत.