कुर्डुवाडी दि.४(प्रतिनिधी)
येथील रेल्वे कारखाना बंद करण्याच्या प्रस्तावाला तत्वतः मंजुरी मिळाली असताना संसदेत तीन वेळा या कारखान्याबात प्रश्न उपस्थित करुन हा कारखाना वाचवण्यात यश आल्याचा आनंद आज अधिक होत आहे चिंकहिल येथील सुरक्षाबलाचे प्रशिक्षण केंद्र हलविण्याचा प्रस्ताव पूर्वीच झाला असल्यामुळ ते वाचवता आले नाही कुर्डुवाडी रेल्वे वर्कशॉपमध्ये नव्याने मंजूर झालेल्या ५११ पदाची भरती बरोबरच येत्या अधिवेशनात या कारखान्याचा आणखी विस्तार करण्यासाठी प्रस्ताव मंजूर करून बजेट मध्ये मंजुरी मिळवण्यासाठी माझा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले.
भारतीय रेल्वे तर्फे लातूर येथे रेल्वे प्रवासी कोच कारखानाची उभारणी केली जात आहे त्यापेक्षा चिंकहिल येथील रेल्वे सुरक्षा बल प्रशिक्षण केंद्राच्या १२० एकर रेल्वेच्या जमिनीवर जर संयुक्तीक ठरत असेल तर चिंकहिल येथे रेल्वे प्रवासी कोच कारखान्याची मागणी करणार असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले तर बंद झालेल्या रेल्वे हायस्कूलच्या ठिकाणी सीबीएससी पॅटर्नचे केंद्रीय विद्यालय सुरू करण्यात यावे अशीही मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच कुर्डुवाडी शहरातील मंजूर ट्रामा केअर र सेंटर व टेंभुर्णी येथील उपजिल्हा रुग्णालय, दोन न्यायमूर्तींचे बेंच कुर्डुवाडी येथे स्थापन करणे, कुर्डुवाडी शहरातील गेट नं ३८ येथे सब- वे ऐवजी उड्डाणपूल करावा,मुंबई -विजापूर-मुंबई आठवड्यातील सर्व सातही दिवस धावावी मुंबई – विशाखापट्ट्णम् या गाडीस कुर्डुवाडी येथे थांबा मिळावा कुर्डुवाडी येथील रेल्वे ड्रायव्हर व गार्ड यांची लाॅबी लातूरला हलविण्याचा षडयंत्र सुरु आहे तरी ते कुर्डुवाडीतच कायम रहावे आदी प्रलंबित प्रश्न व मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,तालुका अध्यक्ष योगेश बोबडे,माजी शहराध्यक्ष विजयसिंह परबत आदी उपस्थित होते.