कुर्डूवाडीत दि.०६(प्रतिनिधी)
पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसा निमित्त कुर्डूवाडी प्रेस क्लबच्या वतीने उम्मीद या एड्स बाधीत मुलांच्या शाळेतील मुलांना फळे व खाऊचे वाटप करण्यात आले .
पोलिस उपनिरीक्षक चिमणाजी केंद्रे मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव निलेश देशमुख,सोलापूर जिल्हा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष हर्षद मोरे,पत्रकार श्रीनिवास बागडे,विनायक दीक्षित,सतिश महिंगडे,वसंत कांबळे,लक्ष्मण कांबळे,अनिल कांबळे,महेश वाळुजकर,बाबाफरीद पठाण,नितिन वाघमारे,सोमनाथ शिंदे,संतोष वाघमारे,शफी शेख,अंकुश आतकर,शिरीष महामुनी,विजयकुमार कन्हेरे यांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटप करण्यात आले तसेच मुकबधीर शाळेला रोख स्वरुपातही मदत करण्यात आली यावेळी पत्रकार विनायक पाटील यांनी सर्व उपस्थित पत्रकारांचे आभार मानले .