सोलापूर दि.०७(प्रतिनिधी)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष व विधी विभागाच्या बार्शी तालुकाध्यक्ष पदी बार असोसिएशनचे सदस्य ॲड.अनंत आप्पाराव मस्के यांची निवड प्रदेश सरचिटणीस ॲड.किशोर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली परंडा येथील शासकीय विश्रामगृहात करण्यात आली यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या याप्रसंगी ॲड अरूण लंबुगोड ॲड नंदकिशोर खरसडे ॲड अविनाश जाधव ॲड रियाज बागवान ॲड पवन मोरे ॲड स्वाती ठोसर ॲड रमेश चव्हाण ॲड गणेश फावडे ॲड अक्षय दोशी उपस्थित होते.
बार्शी येथील जाणीव फाउंडेशनच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करीत भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष तुळशीराम मस्के उपाध्यक्ष वसंत हवालदार सचिव राणाप्रताप देशमुख पवन खरसडे संतोष मस्के उमेश साळुंखे राजाभाऊ नवगण संतोष पवार ज्ञानेश्वर मारकड किरण लुंगारे आदी उपस्थित होती
या निवडीनंतर त्यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन केले जात आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादी लीगल सेलचे तालुकाध्यक्ष ॲड.हर्षवर्धन बोधले यांनी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचे पाहवयास मिळत आहे.