पस्तीस हजार कामगारांना दिला जागेवरच दिवाळी फराळ.
महेश देशमुख (सोलापूर)
शेकडो किलोमिटर वरून उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक कुटूंबे ऊस तोडणी करण्यास अगदी लहानांपासून ते थोरा-मोठ्यापर्यंत स्वता:च्या घरापासून राज्यातील साखर कारखान्याकडे जात असतात. ते ऐन सणाच्या काळात घर सोडतात त्यामुळे त्यांची दिवाळी ही ऊसाच्या फडावरच असते हि गोष्ट लक्षात घेत माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांनी विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडे आलेल्या ट्रक,टॅक्टर,बैलगाडी वरील सुमारे पस्त्तीस हजार ऊस तोडणी मजूरांना फराळाचे वाटप करत माणुसकी जपण्याचे काम केले आहे.
विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडील ऊस तोडणीची यंत्रणा सज्ज असून कारखान्याच्या वतीने माढा,पंढरपूर,माळशिरस,करमाळा,इंदापूर,परांडा ,मोहोळ या तालुक्यामध्ये नोंदी प्रमाणे ऊस तोडीचा कार्यक्रम सुरु आहे. सर्व ऊस तोडणी करणारे मजूर विविध भागात काम करत आहेत. त्यांच्यासाठी विठ्ठलराव शिंदे साखर कारख्यान्याने गेल्या आठ दिवसापासून कारखाना स्थळावरून ३० टनाची बुंदी व १५ टन चिवडा बनवून तयार केलेला आहे.त्यासाठी जवळपास ७५ लाख रुपयांचा खर्च आलेला असून गोरगरीब ऊस तोडणी मजूरांची दिवाळी गोड व्हावी या उदात्त हेतूने अहोरात्र काबाड कष्ट करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाना २किलो बुंदी व १ किलो चिवडा यांचे पॅकींग तयार करून उसाच्या फडावरच काम करत असलेल्या ठिकाणी कारखान्यामार्फत पोहोच केले आहेत शुक्रवार पासून प्रत्येक वाहनाच्या टोळीवरील व बैलगाडीच्या ३५ हजार मजूरांना पॅकींग पोहोच करण्याचे काम झाले आहे.
कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांच्या संकल्पनेतून विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना हा नेहमी सामाजिक उपक्रम राबवित आलेला आहे, यापुर्वी देखील अनेक उपक्रम करत आपली वेगळी ओळख या साखर कारखान्याने आत्तापर्यंत निर्माण केलेली आहे असे कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. एस. रणवरे यांनी सांगितले. आ.शिंदे यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक ऊस तोडणी मजूर यांच्यासह विविध स्तरातुन होत आहे.
ऊस तोड मजूर सणासुदीच्या काळात स्वता:च्या घरापासून दूर राहत बाहेर जाऊन मजूरी करतात अशा कुटुंबांना, मुलाबाळांना दिवाळीमध्ये गोड काही तरी द्यावे हा विचार मनात ठेऊन कारखान्यामार्फत सोळा हजार कुटुंबांतील मजुरांना प्रत्येकी दोन किलो बुंदीचे लाडू व एक किलो चिवडा याचे पॅकिंग करुन देण्याचे काम केले त्यामुळे त्यांनाही दिवाळी सणाचा आनंद मिळेल अशी भावना आ.बबनराव शिंदे व्यक्त यांनी केली .