तासगाव चे प्रसिद्ध श्री गणपती मंदिर भाविकांसाठी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर खुले

0
83

श्री गणपती पंचायतन ट्रस्टचे विश्वस्त डॉ.आदिती पटवर्धन सुहास शिंदे सुशील थोरबोले  यांची प्रमुख उपस्थिती

तासगाव प्रतिनिधी

दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राचे महा विकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे नियमांचे पालन करून नागरिकांसाठी खुले करण्याची परवानगी दिली होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व प्रार्थना स्थळे पाडव्याच्या शुभमुहूर्तावर खुली झाली आहेत. यामध्ये तासगावचे प्रसिद्ध श्री गणपती मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. यावेळी श्री गणपती पंचायत देवस्थानचे वतीने मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट व आकर्षक रांगोळी काढून तासगावच्या गौरी हत्तीच्या व पारंपारिक ढोल ताशा च्या गजरात श्रींची महाआरती करून श्री गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले आहे सर्व भाविकांना दर्शनाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ९ पर्यंत घेता येईल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात प्रवेश करताना भक्तांना सनी टायझर दिले जात आहे मास्कचा  वापर करावाच लागेल अन्यथा मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही. महाराष्ट्र शासनाचे सर्व नियम पाळून तसेच सोशल डिस्टंसिंग चा वापर करून श्री गणपतीच्या दर्शनाचा लाभ भाविकांसाठी दिले जाणार असल्याची माहिती मंदिर व्यवस्थापक सुशील थोरबोले यांनी दिली आहे‌.यावेळी श्री गणपती पंचायतन ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त डॉ.आदिती पटवर्धन, सुहास शिंदे,श्री चे सेवक अथर्व जोशी, ऍड. राजेंद्र जोशी, अनंत जोशी, प्रवीण माळी,गिरीश रेंदाळकर, हर्षल कीर्तकर,राजू पाटील, सौरभ जोशी, शिवप्रसाद पैलवान, प्रशांत पैलवान, अनिकेत माळी, सुधीर माळी, सर्व पुजारी मंडळी व श्री चे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते आठ महिन्यानंतर श्री गणेश मंदिर  भाविकांना दर्शनासाठी खुले झाले असल्याने भाविकांच्या मनामध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण दिसून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here