करमाळा प्रतिनिधी
नरभक्षक बिबट्याने आज करमाळा तालुक्यात दुसरा बळी घेतला असून अंजनगाव येथील महिला जयश्री शिंदे वय 25 शेतातील लिंबोणीच्या बागेतील लिंबे वेचण्या गेली असता बागेत दडून बसलेला नरभक्षक बिबट्या ने सदर महिलेच्या गळ्याचा घोट घेऊन तिच्या शरीरापासुन वेगळे केले.उरलेले मुंडके त्याच ठिकाणी टाकून शरीराचा उरलेला भाग घेऊन बिबट्या पसार झाला आहे. ही घटना आज संध्याकाळी सातच्या सुमारास घडली
याच बिबट्यांनी तीन तारखेला कुंदेवाडी तालुका करमाळा येथे एका युवकाचा बळी घेतला होता
अत्यंत क्रूरपणे हा बिबट्या मनुष्य प्राण्याचा बळी घेऊन त्याचे रक्त पिऊन उरलेली डेड बॉडी तसेच टाकून पसार होत आहे
या नरभक्षक बिबट्यांनी आष्टी जिल्हा बीड येथे तीन जण ठार केल्याची माहिती आहे आणि दोन मिळून असे पाच जणांचा बळी घेतल्यानंतर मनुष्यप्राण्याच्या रक्ताची चव लागल्यामुळे तो येणाऱ्या काळात अनेक बळी घेईल अशी भीती व्यक्त होत आहे
या बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने तीन पिंजरे लावले असून 40 कर्मचारी आहेत वेळ प्रसंगी आता या बिबट्याला गोळ्या घालून ठार मारा अशी मागणी जनतेतून होत आहे
या नरभक्षक बिबट्या बरोबरच करमाळा तालुक्यातील भिलारवाडी येथे एक बिबट्या फिरत असून आज त्यांनी एडवोकेट प्रमोद जाधव यांना दर्शन दिली हा बिबट्या मात्र नर्भक्षक नसून तो शेळ्या बोकड असे पाळीव प्राणी लक्ष करत आहे
त्याच बरोबर आज मागि परिसरात बागल कुटुंबियांच्या शेतातून एक मादी बिबट्या व त्याच्या बरोबर बिबट्याचे पिल्लू फिरत असताना महिलांनी पाहिले पण या बिबट्याच्या आणि मनुष्य प्राण्यावर हल्ला न करता ती मादी पोथरे शिवारात गेली सुजित बागल यांनी ही माझी व पिल्लू बघितल्याचा पुराव्यासह दावा केला आहे
तीन तारखेला कुंदेवाड केलेली शिकार व आज अंजन डॉ येथे केलेली शिकार या दोन्ही ठिकाणात केवळ दहा किलोमीटरचा अंतर आहे
आज रात्री हा बिबट्या झरे खडकेवाडी या परिसरातून पुढे उमरड करीतच करेल असे वन खात्याचा अंदाज आहे
काल दुपारी उमरेड मध्ये या बिबट्याचे काही नागरिकांना दर्शन झाले होते
करमाळा तालुक्यातील त्यामुळे प्रचंड दहशत निर्माण झाली असून शेतीची कामे ठप्प झाली आहेत वस्तीवर राहणारे शेतकरी मोठे-मोठे ॲटम बॉम्ब उडवून आवाज निर्माण करून आपण स्वतः सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करत आहेत
वन खाते वन खात्याचे अधिकारी केवळ प्रसिद्धी व नौटंकी करण्यात मग्न आहेत गेली पंधरा दिवसांपासून करमाळा तालुक्यात फिरत होते शेतकऱ्यांनी नागरिकांनी तक्रारी केल्या यावेळी वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी हा बिबट्या नसून इतर प्राणी असल्याचा दावा करून उपाययोजना करण्यास टाळाटाळ केली
दोन वर्षांपूर्वी उंदरगाव येथे पकडलेला बिबट्याचे वेळीसुद्धा गावकरी टाहो फोडून सांगत होते का बिबटे आहे पण वन खाते म्हणायचे हा बिबट्या नाही शेवटी योगायोगाने बिबट्या जाळ्यात सापडल्यामुळे वन खात्याचे अधिकारी तोंडावर पडले होते
आता वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी नौटंकी बंद करून उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे