कुर्डुवाडीत मनसेच्या वतीने प्रांताना निवेदन
कुर्डुवाडी दि.११(प्रतिनिधी)
ॲमेझॉन कंपनीच्या वेबसाईट व अँँप्लिकेशनमध्ये मराठी भाषेचा वापर नसल्याने मनसे कडून मराठी भाषेचा आग्रह करण्यात आला आहे याचे निवेदन प्रांताधिकारी यांना मनसे शहर संघटक आकाश लांडे यांनी दिले आहे.
भारता मधली ऑनलाईन शॉपिंग वेबसाइटमध्ये मराठी भाषा चा पर्याय नाही सदर मराठी भाषा यांच्या वेब पोर्टल ॲप्लिकेशनमध्ये असावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज ठाकरे यांच्या मार्गदर्शना खाली महाराष्ट्र राज्यामध्ये आंदोलन करण्यात आले असून अद्याप सदर एकाही कंपनीचे मराठी भाषेचा पर्याय त्याच्या वेब पोर्टलमध्ये दिसला नाही
यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुर्डुवाडी शहराच्या वतीने आज रोजी पासून कुर्डुवाडी व माढा तालुका परिसरातील सर्व ऑनलाईन शॉपिंगच्या डिलिव्हरी बंद करण्यात येतील जोपर्यंत मराठी भाषेचा वापर या वेबवरील पोर्टलमध्ये होत नाही तो पर्यंत सर्व डिलिव्हरी बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला यावेळी शहराध्यक्ष सागर बंदपट्टे उपाध्यक्ष गणेश चैधरी सागर लोकरे शहर सचिव विनायक सांतव ओमराज लांडे उपस्थित होते