एकाला अटक, तिघांचा शोध सुरु ; सपोनि केंद्रेच्या पथकाला यश
कुर्डूवाडी दि.०१(प्रतिनिधी)
कुर्डूवाडीतील २ व्यापाऱ्यांना पिस्तुलासह शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करून फसलेल्या ४ फरारी आरोपींसह मदतनीसचा पर्दाफाश करून १ ला पकडण्यामध्ये तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे सह पथकाला यश आले आहे त्या अरोपीस दि.३ जाने पर्यत ४ दिवसाची पोलीस कोठडी झाली आहे यामध्ये पुण्यातील सराईत गुन्हेगारांपैकी ३ आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत यांचा शोध पोलिस घेत आहेत.
पोलिस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. ३ /१२ /२०२० रोजी घडलेल्या जबरी चोरीच्या घटनेबाबत तसेच दि ९/ १२ /२०२० रोजी कुर्डूवाडी पोलीस ठाणे येथील गुन्हा दाखल क्रमांक ४५३/२० भादवि कलम ३९२,५११,३४ मधील गोपनीय माहितीचे तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून गुन्ह्यातील आरोपींचा सहभाग निष्पन्न केलेला आहे.
या दाखल गुन्ह्यांमध्ये पुण्यातील सराईत गुन्हेगार निलेश विजय गायकवाड,मनोज हाडे,अशोक कसबे यांनी किशोर उर्फ आप्पा बाळू ढवळे वय २४ वर्ष रा- कुर्डूवाडी याच्या मदतीने कुर्डूवाडी तील सराफ व्यवसायिक शुभंकर पाठक याचे डोळ्यात मिरची पूड टाकून प्रसंगी कोयत्याचा व पिस्तुलीचा वापर करून लुटण्याची योजना आखून योजना प्रत्यक्षात आमलात आणली होती.सदर आरोपींचा प्रयत्न फसल्याने आरोपींनी पोबारा केला होता सदरची योजना आखण्यापूर्वी आरोपी ४ दिवस कुर्डूवाडी शहरात गोपनीय ठिकाणी वास्तव्य करून रेकी करीत होते.
दि. १६/११/२०२० रोजी संध्याकाळी चे सुमारास सराफ व्यवसायिक विशाल भारत पुरवत यांनाही पिस्तूलीचा,शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न झालेला आहे.या घटनेमध्येदेखील सदर आरोपींचा सहभाग निष्पन्न झालेला आहे अटक आरोपीचे नाव किशोर उर्फ आप्पा बाळू ढवळे वय २४ वर्ष रा- कुर्डूवाडी उर्वरित तीन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत
डॉ. विशाल हिरे उपविभागीय पोलिस अधिकारी करमाळा उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांचाकड़े तपास सूत्र दिली यावर पोलीस डिटेक्शन टीम ने तपासी अधिकारी सह पोलीस शिपाई दत्ता सोमवाड,सागर गवळी संभाजी शिंदे, सोलापूर सायबर क्राईम चे अन्वर आतार व पोलीस शिपाई माळी याांनी ही मोहीम फत्ते केली या सर्वांचे शहर परिसरातील व्यापारीतून कौतुक होत आहे