उस्मानाबाद – तालुक्यातील सारोळा बु गावाजवळ दि.१ रोजी सायंकाळी ६:३० सुमारे दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक लागली. या अपघातात दोन्ही वाहनचाक गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मोटारसायकल क्रमांक एम एच २५ ई ९९६२ तर दुसऱ्या मोटारसायकल क्रमांक एम एच २४ टी २९७८ आहे. दोघांनाही उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक व्यक्ती बेंबळी तर दुसरी व्यक्ती टाकळ( सुंभा) येथील आहे.