समाधान आवताडेंच्या विरोधात पंढरपूरातील विरोधी उमेदवार कोण?
पंढरपूर तालुक्यांमध्ये समाधान आवताडे यांचे आकर्षण वाढले
पंढरपूर ( बालम मुलाणी ):-
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आ भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या पोटनिवडणुकीसाठी हालचाली गुप्त असल्या तरी गतिमान झाल्या आहेत. यामध्ये मंगळवेढ्याचे भूमिपुत्र आणि दामाजीचे चेअरमन उद्योजक समाधान आवताडे यांनी स्वतःहून खुलासा करीत आपणाला या पोटनिवडणूकसाठी भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्हीही पक्षाकडून विचारणा होत आहे. त्यामुळे आवताडे यांची तर या निवडणुकीतील उमेदवारी पक्की झाली असून ते नेमके कोणत्या पक्षाची उमेदवारी स्वीकारणार आहेत, यावरूनच त्यांच्या विरोधात पंढरपूर भागातील आवताडे यांचा प्रतिस्पर्धी कोण असणार हे स्पष्ट होणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार केला तर सततच्या दौऱ्यामुळे व गाठीभेटी वर जोर ,कार्यक्रमाला हजेरी, लग्नसमारंभात आवर्जून उपस्थित राहून सर्वांच्या संपर्कात असणारे समाधान दादांचे आकर्षण वाढले आहे.
आवताडे यांनी मागील महिन्यापासून नव्हे तर मागील ग्रामपंचायत निवडणुकीपासूनच आपली तयारी ठेवत पंढरपूर तालुक्यातील गावामध्ये आपले उमेदवार उतरउन गावोगावी आपले बस्थान बसविण्यात यशही मिळविले आहे. त्यामुळे मंगळवेढा तालुक्यात क्रमांक एकवरच असणारे आवताडे यांची मताची आकडेवारी पाहूनच आता उमेदवारी देण्यासाठी दोन्हीही पक्ष तयारी दाखवीत आहेत.
या पोटणीवडणुकीसाठी राष्ट्रवादी कडून विठ्ठलचे चेअरमन भगीरथ भालके यांना तर भाजप कडून परिचारक यांच्या कुटुंबातील कोणालातरी उमेदवारी मिळेल असे त्यांच्या समर्थकांनी तर्क वितर्क सुरू केले आहेत. परंतु या पंढरपुर च्या दोन्ही प्रस्थापित आणि प्रतिस्पर्धी पैकी नेमके कोण असणार ते समाधान आवताडे यांच्या उमेदवारी वरून समजणार आहे.,
सध्या आवताडे यांचेही पंढरपूर भागातील भेट दौरे वाढले आहेत. यावेळी त्यांच्या स्वागतासाठीही तितक्याच प्रमाणात गर्दीही वाढून जणूकाही उमेदवारीला पाठिंबा व्यक्त होत आहे. या परिस्थितीमुळेच आवताडे यांनी पुन्हा एकदा नशीब अजमविण्यासाठी तयारी बांधली असून कार्यकर्त्यातूनही उत्साह वाढू लागला आहे.
एकंदरीत आगामी पोटनिवडणुकीतील परिस्थिती विचारात घेता समाधान आवताडे फिक्स उमेदवार तर त्यांना लढत देण्यासाठी नेमका कोण प्रतिस्पर्धी उमेदवार असेल हे लवकरच दिसून येणार आहे.