मुख्य अभियंत्यांनी केला नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार
उस्मानाबाद – महावितरणची थकबाकी नसलेली एकमेव उस्मानाबादची नगरपालिका ठरली असल्याने मुख्य अभियंता यांनी स्वतः नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांचा सत्कार केला आहे.
याबाबत माहिती अशी की,
उस्मानाबाद येथील नगर पालिकेची 31 मार्च 2018 पर्यंत पाणीपुरवठा व पथदिवे यांची थकबाकी एकुण 654.54 लक्ष एवढी होती. त्यापैकी शासन निर्णय क्र.संकीर्ण 2018/प्र.क्र.36/नवि-04 दिनांक13/08/2018च्या परिपत्रकानुसार उस्मानाबाद नगर पालिकेचे 50 टक्के रक्कम नगर विकास खात्याने 14 व्या वित्तआयोगाच्या निधीमधुन परस्पर महावितरण कंपनीला अदा केली व उर्वरित 50 टक्के रक्कम ही उस्मानाबाद नगर पालिकेने शासनाने हप्ते पाडुन दिल्या प्रमाणे सुलभ 15 हप्त्यांमध्ये वेळच्यावेळी भरणा केले. तसेच उस्मानाबाद नगर परिषद चे पाणी पुरवठ्याचे हातलादेवी पंपहाऊस, तेरणा फिल्टर, तेरणा बुस्टर , रुईभर फिल्टर तसेच शहरातील बोर मिळुन 107 कनेक्शन आहेत व पथदिवे , नगरपालिका कार्यालय व शाळा यांचे एकुण 207 कनेक्शन असुन प्रत्येक महिन्याला महावितरण चे साधारणः 35 ते 40 लाख रूपये लाईट बिला पोटी भरणा केला जातो. त्यामुळे आज तागायत 1 रूपयाही थकबाकी नसलेली महाराष्ट्रातील एकमेव उस्मानाबाद नगर पालिका ठरली आहे. त्यामुळे महावितरण चे मुख्य अभियंता मुंबई भारत जाडकर यांनी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर आणि मुख्याधिकारी हरिकल्यान येलगट्टे यांचा नगर परिषद उस्मानाबाद येथे येऊन यथोचित सत्कार व अभिनंदन केले.
यावेळी उस्मानाबाद महावितरण चे अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर महेंद्र वाघमारे, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह निलांबरी कुलकर्णी आदी उपस्थित होते.