स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांना उदगावात अभिवादन

0
88

शिक्षण संकुलाचा वटवृक्ष बनवण्याचा निर्धार

जयसिंगपूर – प्रतिनिधी  

शिरोळ तालुक्यातील दत्त उद्योग समूहाचे संस्थापक चेअरमन तथा उदगाव येथील  उदगाव एज्युकेशन सोसायटी संचलित  डॉ. अप्पासाहेब ऊर्फ सा रे पाटील उदगाव टेक्निकल हायस्कूलचे संस्थापक चेअरमन स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. आज सकाळी उदगाव टेक्निकल हायस्कूलच्या प्रांगणात हे पुण्यस्मरण झाले. स्व. आप्पासाहेब यांच्या प्रतिमेस विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. उपस्थितांनी अभिवादन केले. स्व. पाटील यांनी उदगाव येथे रोपण केलेल्या या शिक्षणसंकुलाचे वटवृक्षात रुपांतर करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.

यावेळी शाळा समितीचे चेअरमन बाळासाहेब कोळी व संचालक सुरगोंडा पाटील, रमेश पाटील, यशवंत माने, पांडुरंग चंदुरे, आक्काताई मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

या अभिवादन सभेचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक एस. एस. जंगम यांनी केले. सुत्र संचलन अध्यापिका ए. पी. खंजिरे यांनी केले. आभार पर्यवेक्षक आर. एम. मोरे यांनी मानले. यावेळी सर्व अध्यपक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विध्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here