back to top
Sunday, December 22, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याबनावट कोरोना रिपोर्ट तयार करणारी वात्सल्य पॅथॉलॉजी लॅब पंढरपुरात सील

बनावट कोरोना रिपोर्ट तयार करणारी वात्सल्य पॅथॉलॉजी लॅब पंढरपुरात सील

 

दोघांवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी  /मगरवाडी         बनावट कोरोना तपासणी अहवाल तयार करणारी वात्सल्य पॅथॉलॉजी लैबोरेटरीवर कारवाई करत  गुरुवारी सील करण्यात आली आहे. 

     कोविड तालुका कृति समिती मार्फत पंढरपुर शहरातील अनधिकृत कोविड टेस्टिंग करुन बनावट रिपोर्ट  वात्सल्य पॅथॉलॉजी लॅब देत होती. याची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालय पंढरपूरचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. गिराम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले नायब तहसीलदार कोळी, पोलिस उपनिरीक्षक मगदूम यांच्या पथकाने अचानक धाड़ टाकली. यावेळी वात्सल्य लॅब चालक  आदमिले यास अवैध रिपोर्ट तयार करताना आणि रॅपिड अँटिजेंन  टेस्ट किट सहित  रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्याला किट पूरवणारा तसेच बनावट अहवाल तयार करुन देणारा  उमेश शिंगटे यालाही पकडले आहे. आदमिले व उमेश शिंगटे या

दोघानी हे काम गेल्या 2-3 महिन्यापासुन करत असल्याची कबुली दिली. याबाबत शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे.

यावरून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुह्यात अजुन किती जण आहेत, याची चौकशी चालू आहे.

अशा प्रकारची कोणतीही अनधिकृत कोविड टेस्टिंग आपल्या रुग्णालय अथवा लॅब मध्ये केली जात नाही. याची पंढरपुर शहर व तालुक्यातील सर्व डॉक्टर्स आणि पॅथॉथोलॉजी लॅब चालकानी दक्षता घ्यावी, असे आवाहन वैद्यकिय अधीक्षक डॉ. गिराम यानी केले आहे.  जर असे काही आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन  कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments