परंडा [दि १०एप्रील ]टॅक्टर ला साईट न देता ध्डक देऊन जातीवाचक शिवीगाळ करून आण्णा भोसले यांना मारहान करण्यात आली ही घटणा दि ९ रोजी सायंकाळी परंडा तालूक्यातील आसू येथे घडली या प्रकरणी पाच जना विरूध्द दि १० रोजी परंडा पोलिसात ऑक्ट्रासिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत पोलिसा कडून मिळालेली माहिती अशी की आसू येथील टॅक्टर चालक राहुल भोसले हे दि ९ एप्रील रोजी टॅक्टर मध्ये गाळ भरून शेतामध्ये टाकन्या साठी जात असताना चाळशी तलावा जवळ आला असता समोरून योगेश वाघे हा टॅक्टर घेऊन तलावा कडे जात होता योगेश वाघेने राहुल भोसले यांच्या टॅक्टर ला साईट न देता धडक दिली व जातीवाचक शिवीगाळ करून टॅक्टर मालक अविनाश जगताप व चालक योगेश वाघे व नितीन वाघे यांनी मारहान केली .
या घटनेची माहिती मिळाल्यावर राहुल भोसले यांचे वडील आण्णा भोसले यांनी जाब विचारन्या साठी रमेश जगताप यांना बोलावले व कश्या साठी माझ्या मुलाला मारले असे विचारले असता जातीवर शिवीगाळ करीत तुम्हाला कश्याला एवढा माज असे म्हणत अविनाश रमेश जगताप,अमोल रमेश जगताप,रमेश जगताप , अमोल जगताप यांनी मारहान केली .
या प्रकरणी आण्णा भोसले यांनी दिलेल्या फिर्यादी वरून वरिल सर्व आरोपी विरुद्ध अनुसुचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायदया नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
घटणेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस आधिकारी डॉ.विशाल खांबे,पोलिस निरीक्षक सुनिल गिड्डे,पोलिस उप निरिक्षक ससाने,पोलिस कॉन्स्टेबल गीते,चालक घोगरे यांनी घटणा स्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे .
पुढील तपास उप विभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे हे करीत आहेत .