पागागल्ली येथे बोगस काम सुरू असल्याचे समजतात काँग्रेस पक्षाचे नेते महादेव पाटील नगरपालिका विरुद्ध आक्रमक
तासगाव :-
सध्या तासगाव शहरांमध्ये भुयारी गटार योजनेचे काम सुरू असून तासगाव शहरातील 50 ते 60 टक्के भागातील सांडपाणी वाहून सांगली नाका पागा गल्ली परिसरात आणून तेथून कापूर ओढ्याकडे तीनशे एमएम जाडीच्या सिमेंट पाईप मधून सदरचे सांडपाणी वाहून नेण्यात येणार आहे. सध्या त्या भागातील दोनशे ते तीनशे मीटर चे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून थोड्या कडून या कामाला सुरुवात झाली असून गेले आठ ते दहा दिवस ते काम सुरू आहे परंतु पागा गल्ली भागातील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार राहुल कांबळे यांच्या घराच्या परिसरामध्ये सदरचे काम सुरू होते. परंतु आज त्या भागातील अनुभवी गवंडीकाम करणाऱ्या व्यक्तीने चेंबरचे बांधकाम हे बोगस असून सिमेंट हलक्या दर्जाचे व पाणी न मारता वीट न भिजवता केले असून एका दिवसांमध्ये 12 फुटाचे उंचीचे चेंबर उभा करून ते फुटलेल्या अवस्थेत मुजवण्याचा प्रयत्न आज सकाळी करण्यात आला होता. सदरची बाब पत्रकार राहुल कांबळे यांच्या निदर्शनास येताच त्या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्यांनी सदरच्या ठेकेदाराला धारेवर धरले आणि बोगस काम बंद करण्याचे सांगितले. सदाची हे बाप काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महादेव नाना पाटील जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र शेठ साळुंखे यांच्या निदर्शनास आणून दिले असता तातडीने दोन्ही नेते तसेच डॉक्टर व युवा नेते शरद शेळके यांनी सदरच्या ठिकाणी धाव घेतली आणि सदरचे बोगस काम आहे हे सह्या सर्वांच्या लक्षात येताच शरद शेळके यांनी सदरची घटना फेसबुक वर लाईव्ह केली. तातडीने नगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी प्रताप घाडगे यांना दूर करून सदरची माहिती दिली व त्यांना बोलावून घेण्यात आले वस्तुस्थिती आल्यानंतर प्रताप घाडगे यांना सदर चे सर्व काम बोगस असल्याचे निदर्शनास आले त्यांनी तातडीने सर्व गोष्टीचा पंचनामा केला. त्या पंचनाम्यावर पागा गल्ली भागातील शेकडो नागरिकांनी उस्फूर्तपणे सह्या केल्या आहेत हे विशेष होय. पुन्हा सायंकाळी सहा वाजता तासगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज माने-पाटील, इंजिनीयर चेतनकुमार माळी, आरोग्य अधिकारी प्रताप घाडगे याने सदस्य कामावर पुन्हा भेट दिली यावेळी सदरचा प्रकार असा ओल्ड उघडकीस आणला याबद्दलची माहिती पत्रकार राहुल कांबळे यांनी पृथ्वीराज पाटील मुख्याधिकार्यांना दिली, यावेळी सदरचे ठेकेदाराचा सुपरवायझर व त्यांचे कर्मचारी हजर होते त्यावेळी एका चेंबूर पासून दुसऱ्या चेंबूर पर्यंत ३५० एम.एम.जाडीच्या पाइपच्या मध्ये तीन पाईप ३०० एम.एम.जाडीच्या पाईप घातल्याचे निदर्शनास आणून दिले, तसेच पेन्ना कंपनीच्या कमी प्रतीच्या सिमेंटचा वापर केल्याचे लक्षात आणून दिले. यावेळी एक केलेले निकृष्ट दर्जाचे चेंबर तातडीने जेसीबीने पाडण्यात आले. आणि हे चेंबर उत्कृष्ट सिमेंटच्या वापराने पुन्हा उद्या सकाळी बांधण्याचे आदेश दिले तसेच तीनशे एमएम जाडीच्या पाइप उद्या पुन्हा जेसीबीने उकडून कोटेशन प्रमाणे 300m जाडीच्या सिमेंट पाइप घालण्याचे तातडीचे आदेश दिले अन्यथा योग्य ती कारवाई करण्याची सक्त सूचना व आदेश कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी सदर च्या ठेकेदाराला दिली आहे. सध्या तासगाव शहरात भुयारी गटार योजना सुरू असून प्रत्येक भागामध्ये कशा पद्धतीचे काम चालू आहे त्या त्या भागातील नागरिकांनी डोळ्यात तेल घालून पाणी गरजेचे आहे प्रत्येक भागातील नागरिक दबक्या आवाजात बोलत असतात की काम बरोबर नाही काम बोगस आहे. परंतु नागरिक पुढे येताना व तक्रार करताना दिसत नाहीत. मध्यंतरी संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष अमोल कदम यांनी शिंदे गल्ली भागांमध्ये सुरू असलेले बोगस काम बंद पाडले होते व एमजीपी अधिकाऱ्यांना बोलावून त्या गोष्टीचा पंचनामा करून पुन्हा ते काम करण्यास भाग पाडले होते हे विशेष होय तसेच गेल्या वर्षी सदरचे काही भागांमध्ये बोगस काम असल्याचे राष्ट्रवादीच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या निदर्शनास आले होते ते काम त्यावेळी त्या नगरसेवकांनी बंद पाडले होते परंतु आता पुन्हा हे भुयारी गटार योजनेचे काम कसे काय सुरू झाले याची उघड चर्चा तासगावकर नागरिक करत आहेत.पागागल्ली येथील भुयारी गटार योजनेतील बोगस बांधकामाचा प्रकार उघडकीस आल्याने याबाबतीत तासगाव तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महादेव नाना पाटील आक्रमक झाले असून उद्या अकरा वाजता मुख्याधिकारी तासगाव यांना आपल्या शिष्टमंडळ सहित भेटणार असून तासगाव शहरांमध्ये ज्या ज्या भागांमध्ये बोगस काम सुरू आहे असे नागरिकांच्या निदर्शनास आले असेल तर त्यांनी तातडीने आमच्याकडे तक्रार करावी आम्ही सदरचे बोगस काम पुन्हा योग्य रीतीने करू कारण जनतेच्या पैशाचा अशा पद्धतीने सत्ताधारी व विरोधी पक्ष मिलीभगत करून उधळपट्टी जर करत असेल तर कुठल्या परिस्थितीत तासगावकर नागरिक सहन करणार नाहीत. आज तासगाव शहरातील पागागल्ली येथील एक घटना उघडकीस आली आहे परंतु अशा इतर भागात घडू नये यासाठी तासगाव शहरातील प्रत्येक भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. भुयारी गटार योजनेतील सांगली नाका पागा गल्ली परिसरातील बोगस काम सामाजिक कार्यकर्ते पत्रकार राहुल कांबळे यांनी उघडकीस आणल्याने पागा गल्ली भागातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.