काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष एॅड. गजानन खुजट ऍक्शन मोडमध्ये
तासगाव प्रतिनिधी/राहुल कांबळे
:तासगाव शहरात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर गुरुवारी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे वतीने तालुकाध्यक्ष महादेव नाना पाटील यांनी पुढाकार घेत काँग्रेस आपल्या दारी या उपक्रमांतर्गत तासगाव शहरातील विविध भागांमध्ये औषध फवारणी करण्याचे काम सुरु केले होते यामध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, एसटी स्टँड चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर व गुरुवार पेठ, सिद्धेश्वर रोड, वरचे गल्ली इत्यादी भागांमध्ये औषध फवारणी केली आहे. यावेळी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ज्येष्ठ नेते गजानन काका कुत्ते, जिल्हा उपाध्यक्ष रविशेठ साळुंखे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुनील भाऊ पाटील, माजी नगराध्यक्ष अजय पवार, माजी नगरसेवक बाबुराव माळी,संभाजी आप्पा सूर्यवंशी, दशरथ चव्हाण, गजानन गेळे, सुनील गायकवाड, चंद्रकांत माळी, अशोक गुरव, तासगाव तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश पाटील, इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते सध्या तासगाव शहरातील काँग्रेस ऍक्शन मोडमध्ये असून तासगाव तालुका अध्यक्ष महादेव पाटील व त्यांचे सर्व काँग्रेस पक्षाचे सहकारी रस्त्यावर उतरून तासगाव शहरातील नागरिकांच्या संपर्कात येत असल्याचे चित्र दिसत आहे.या सर्व औषध फवारणी चे सुरुवात काँग्रेस भवन येथून करण्यात आली होती. शुक्रवारी तासगांव कवठे महांकाळ विधानसभा मतदार संघा च्या आम.सुमनताई पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शना खाली तासगाव शहरातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता संपूर्ण शहरात ट्रॅकटर च्या माध्यमातून औषध फवारणी करण्यात आली आहे..मार्केट कमिटी मधील राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यालय पासुन त्याची सुरुवात करण्यात आली. ह्या सर्व ट्रॅक्टरच्या माध्यमातून संपूर्ण शहरात औषध फवारणी करण्यात आली. यावेळी तासगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ऍड गजानन खुजट, माजी नगराध्यक्ष अमोल नाना शिंदे, नगरसेवक बाळासाहेब सावंत, ऍड तुकाराम कुंभार,नगरसेवक अभिजित माळी, कमलेश तांबेकर, , युवक राष्ट्रवादी चे अध्यक्ष अभिजित पाटील,यांच्या उपस्थितीत सदर चा औषध औषध फवारणी चा कार्यक्रम पार पडला यावेळी नगरसेवक वैभव भाट,करण पवार, उदय पाटील, संदीप भैय्या पाटील, सचिन पाटील, माजी शहराध्यक्ष खंडू कदम, इद्रिस मुल्ला, युवा नेते अक्षय धाबुगडे,इ. कार्यकर्ते उपस्थित होते.तासगाव नगरपालिकेच्या निवडणुका सहा ते सात महिन्यावर येऊन ठेपल्या असून त्या अनुषंगाने विरोधी असणारे म्हणजेच तासगाव नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता आहे. त्यामुळे तासगाव नगरपालिकेतील विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व काँग्रेस पक्ष यांनी आपली जबाबदारी ओळखून तासगाव शहरातील जनतेच्या प्रश्नासंदर्भात रस्त्यावर उतरण्याचे धोरण अवलंबू आल्याचे दिसत आहे. चार दिवसापूर्वी पागा गल्ली येथे स्थानिक पत्रकार, व तेथील सुज्ञ नागरिकांनी तेथील भुयारी गटार योजनेच्या भ्रष्टाचार उघड केला होता.त्यावेळेस काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी स्वतः जातीने तिथे उपस्थित राहून सदरच्या ठेकेदाराला धारेवर धरुन तेथील चुकीच्या पद्धतीने भोगस व भ्रष्टाचारी काम बंद पाडले होते व ते चांगल्या पद्धतीने पुन्हा काम करण्याची ताकीत ठेकेदाराला दिली होती, तासगाव नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी पृथ्वीराज माने पाटील यांनीसुद्धा तातडीने तेथील बोगस व भ्रष्टाचारी कामाचा पंचनामा करून पुन्हा योग्य प्रकारे काम करण्याचे आदेश संबंधित नोबेल कंपनीच्या ठेकेदाराला दिले आहे. शुक्रवारपासून तेथील काम पुन्हा पाईप बदलणे व चांगल्या जेके कंपनीच्या सिमेंट मध्ये चेंबर बांधणे इत्यादी काम सुरू झाले आहे.सत्ताधारी भाजपच्या गोटात सध्या शांतता आहे, सत्ताधारी भाजपचे एक नगरसेवक जाफर भाई मुजावर हे लोक संपर्कात असून ते पुन्हा येणाऱ्या पाच सहा महिने वरील तासगाव नगर पालिकेच्या निवडणुकीची तयारी करीत असून वाढत्या कोरोणा पार्श्वभूमीवर शहरातील वाढत्या रुग्ण संख्येच्या अनुषंगाने काम करीत आहेत त्यांच्या वार्डमधील लोकांसाठी किंवा गरजू नागरिकांसाठी त्यांनी ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून दिली आहे हे विशेष होय. तासगाव नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचे नेते व इच्छुक उमेदवार येन केन प्रकारे जनतेच्या संपर्कात येत असल्याचे चित्र सध्या तासगाव शहरांमध्ये दिसून येत आहे. जे विद्यमान नगरसेवक इच्छुक नाहीत त्यांची मात्र भूमिका शांत राहण्याची सद्यस्थितीत दिसत आहे.
*चौकट*
सध्या तासगावात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने तासगाव तालुक्यातील व शहरातील कोरोना बाधित रुग्णांच्या साठी खासदार संजयकाका पाटील यांच्या पुढाकाराने महिला तंत्रनिकेतन येथे ३५ बेडचे व्हेंटिलेटर ऑक्सिजन सहित कोरोना रुग्णालय कार्यान्वित करण्यात आले आहे. या रुग्णालयाची संपूर्ण जबाबदारी मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील माने पाटील व स्वच्छता व आरोग्य अधिकारी प्रताप घाडगे, आयुब मनेर व त्यांचे सर्व सहकारी यांच्यावर असून आहे.सदरचे कोरना बाधित रुग्णांच्या साठी रुग्णालय हे शहरातील कस्तुरबा गांधी रुग्णालय इमारतीच्या ठिकाणी नवी झालेल्या इमारती मध्ये सुरू व्हावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल शिंदे यांनी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांना निवेदन दिले आहे.तीच मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने ही डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडे करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे तासगाव शहरातील व तालुक्यातील नागरिकांची नागरिकांची सुद्धा हीच इच्छा असून तेथील इमारतीमध्ये रुग्णांची व्यवस्था झाली तर त्याचा फायदा कोरोना बाधित रुग्णांना होईल,तर दत्त माळ येथील ग्रामीण रुग्णालय येथे नागरिकांना लस देण्याचे काम अविरतपणे सुरू आहे हे तेथेही द्यावे परंतु वयस्कर लोकांची सोय म्हणून तासगाव शहरातील सरकारी रुग्णालयांमध्ये नागरिकांची लस देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे. ग्रामीण रुग्णालय शेजारी आय.टी.आय. कॉलेजच्या इमारतीत तासगाव कवठेमंकाळ च्या आमदार सुमनताई आर आर पाटील व युवा नेते रोहितदादा पाटील यांच्या पुढाकाराने तेथेही कोरोना रुग्णासाठी व्हेंटिलेटर व ऑक्सिजन सहित कोव्हिड रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. त्या व्यवस्थेची पाहणी दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे नेते रोहित दादा पाटील यांनी केली आहे.