रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर असलेले डॉ.गुळभिले

0
89

 आमचं फॅमिली डॉक्टर गुळभिले डॉ यांच्या शी गेली पंधरा वर्षे म्हणजे आमचं आज्जी आजोबा होते तेव्हा पासून ऋणानुबंध आहेत. अतिशय समजुन साांगत पेशंटला धीर देणे तु लवकर बरा होणार काळजी करु नको मी आहे ना म्हणून पेशंटशी घरातील सदस्यांप्रमाणे एकरुप होणारे डॉ म्हणून मी डॉक्टर मिलिंद गुळभिले यांना मानतो…त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून निम्म्यारात्री पेशटचा फोन उचलणारे त्यांचे चिरंजीव डॉ तुषार गुळभिले यांची ओळख पिलीव भागात झाली आहे… कधी खिशात रुपया नसला तरी मोठे डाक्टर यांनी लोकांना ॲडमीट करून पैसे परत घेतले पैशासाठी कधीही अडवणूक न होणारे डॉ म्हणून मोठे डाक्टर यांचा परिचय आहे…पिलीव सारख्या भागात मुतखडा व इतर आपरेशन होतात हे पिलीवच्या  शिरपेचात डॉ तुषार गुळभिले यांनी मानाचा तुरा रोवला…. आज मोठ्या डॉ चा वाढदिवस होता खुप इच्छा होती भेटायची पण मी बाहेरगावी असलेमुळे भेटु शकलो नाही…. एक लहानपणी चा किस्सा सांगतो मी दहा वर्षाचा होतो साधारण एकोणिशे पंच्च्यानव शहान्नवचा काळ असेल माजी आज्जी आजारी पडली की मोठं डॉ सुझुकी गाडीवरुन बचेरीत एक नंबर तलाव जवळ माझ्या घरी येऊन सलाईन लावायाचे आम्हाला डॉ सलाईन मोटारसायकल याचं खुप नवल वाटायचं असो सांगायचा उद्देश येवढाच आज अक्षय हास्पीटलचे वटवृक्षात रूपांतर झाले यापाठीमागे मोठं डॉ यांचं खुप त्याग कष्ट चिकाटी आहे तेव्हा हे दिवस आले खरच मोठे डाक्टर म्हणजेच मिलिंद गुळभिले तुमचं कौतुक करायला माझ्याकडं शब्द अपुरे आहेत… अशीच सेवा आम्हा युवा पिढीला भविष्यात छोटे डॉ तुषार गुळभिले देतील येवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो पुन्हा एकदा तुमच्या सर्व परिवाराला मानाचा मुजरा पत्रकार विश्वजीत गोरड (M.A.b.ed)  व सदस्य ग्रामपंचायत बचेरी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here