३० ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशिनचे सावंत,साळुके यांच्या हस्ते उपजिलहा रुग्णालयात लोकार्पण

0
82

 परंडा (प्रतिनिधी)कोरोना संकट काळात परंडा तालुक्यातील रुग्णाची वाढती संख्या व त्या प्रमानात ऑक्सिजनचा तुटवडा हे लक्षात घेता. माजी मंत्री आमदार, प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी स्वखर्चाने 30 ऑक्सिजन काँन्सनट्रेटर मशीन खरेदी करुन परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या या ऑक्सिजन काँन्सनट्रेटर मशीनचे लोकार्पण जि.प. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा अरोग्य सभापती धनंजय सावंत व जिल्हा परिषदेचे क्रर्षी व  पशुसंवर्धन.सभापती दत्ता  साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले.

  यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम लटके,माजी नगरअध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल, शिवसेना तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव,नगरसेवक रत्नाकांत शिंदे,मकरंद जोशी, अब्बास मुजावर,दत्ता रनभोर,  नायब तहसिलदार मिलींद गायकवाड ,डॉ.पवार,डॉ.पाटील व वैद्यकीय पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here