रात्री 10 वाजता विधान भवनात थांबून लोकांच्या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेऊन धाराशिव जिल्ह्यातील वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 करण्यात याव्या या मागणीसाठी आमदार कैलास पाटील हे दिवसभर विधानभवनात थांबले. मात्र, त्यांना 10 वाजता बोलण्याची संधी मिळाली. यावेळी आमदार कैलास पाटील यांनी बोलताना म्हटलं की, 30 ते 40 वर्षांपूर्वी इनामी आणि देवस्थानच्या जमिनी नजराणा भरून वर्ग एक करण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्या ठिकाणी लोकांनी घर बांधून आणि लोकांनी त्या जमिनी कसायला सुरुवात केली. मागच्या एक वर्षांपूर्वी त्याच जमिनी पुन्हा महसूल विभागाने वर्ग दोन केल्या असून, महसूल मंत्र्याना याअगोदर यासंदर्भात धाराशिव जिल्ह्यातील काही लोक भेटले आहेत. यावर महसूल मंत्र्यांनी त्यांना आश्वासन देखील दिले होते की, लवकरात लवकर या प्रश्नावर निर्णय घेण्यात येईल. मात्र हा प्रश्न अद्याप मार्गी लागला नाही. विदर्भामध्ये कायदा करून जसा वर्ग एकच्या जमिनी वर्ग दोन केल्या त्याचप्रमाणे मराठवाड्यामध्ये मराठवाड्यासाठी देखील कायदा करून वर्ग दोनच्या जमिनी पुन्हा एक कराव्या अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली. दरम्यान, पुढे बोलताना आमदार कैलास पाटील यांनी कळंब तालुक्यातील हासेगाव – इटकुर आणि कळंब – मोहा – येडशी या रस्त्याची खूप दुरावस्था झाली असून या विषयी प्रश्न मांडत म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात या रस्त्यांना मंजुरी मिळाली होती मात्र शिंदे फडणवीस सरकारमध्ये या रस्त्यांना स्थगिती देण्यात आली. ही स्थगिती तत्काळ उठवावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे. तसेच धाराशिवच्या तालुका क्रीडा संकुलसाठी उद्योग विभागाने 19 हजार स्कवेअर फूट जमीन दिली होती. परंतु एमएमसी ने याला स्थगिती दिली आहे. ही स्थगिती देखील उदय सामंत यांनी उठवावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. त्याचबरोबर कळंब तालुक्याच्या क्रीडा संकुल विषयी देखील आमदार कैलास पाटील यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.
जिल्ह्यातील लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी, आमदार कैलास पाटील दिवसभर विधानभवनातचं, रात्री १० वाजता मिळाली संधी
RELATED ARTICLES