पारा (प्रतिनिधी ):- वाशी तालुक्यातील पारगाव येथील ग्रामपंचायतने पंतप्रधान आवास योजनेत केलेल्या उल्लेखनीय कामा बद्दल जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवला आहे.त्या अनुषंगाने आज वाशी तालुक्यातील विविध गावात उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी भेटी दिल्या होत्या,पारगाव ग्रामपंचायत येथे ही दुपारी एक वाजता भेट दिल्यानंतर विविध योजनांवर चर्चा केली,त्यासोबत पंतप्रधान आवास योजनेत बांधकाम झालेल्या घरकुलांची पडत्या पावसात केली. अधिक माहिती अशी की, वाशी तालुक्यातील विविध गावात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी भेटी दिल्या यावेळी वाशीचे गटविकास अधिकारी विलास खिल्लारे हे सोबत होते.पारगावचा पंतप्रधान आवास योजनेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आला आहे.येथील घरकुल बांधकामाच्या बाबतीत वाशीचे गटविकास अधिकारी विलास खिल्लारे यांनी मार्गदर्शन करत वेळोवेळी घरकुल लाभार्थ्याना मार्गदर्शन केले होते.ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकारी ,ग्रामविकास अधिकारी,कर्मचारी यांनी मेहनत घेत घरकुल बांधकाम लाभार्थ्यांकडून करून घेण्यात आलेले होते. उस्मानाबाद चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या बांधकाम केलेल्या घरकुलांची पाहणी पडत्या पावसात केल्याने,या अधिकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.घरकुल लाभार्थ्याशी चर्चा करत अडी अडचणी विचारण्यात आल्या.ग्रामपंचयात कडून येणाऱ्या काळात राबवल्या जाणाऱ्या विविध योजनेच्या आराखडयाची पाहणी केली.यावेळी जिल्हा स्तरावरील अनेक अधिकारी उपस्थित होते.शिवाय ग्रामपंचायत विस्तार अधिकारी राजू माचवे, सरपंच महेश कोळी,उपसरपंच कॉ.पंकज चव्हाण,ग्रा.प.सदस्य राजाभाऊ कोळी,सुशांत कोकणे,याच्या सह समाधान मोटे,मुकेश औताने,राहुल डोके,अमोल गायकवाड,सुजित औताने आदी उपस्थित होते.