back to top
Sunday, December 22, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याविद्यार्थ्यांवर संस्कार रुजविण्याचे काम महत्त्वाचे - अस्मिता कांबळे

विद्यार्थ्यांवर संस्कार रुजविण्याचे काम महत्त्वाचे – अस्मिता कांबळे

 


        उस्मानाबाद –  सध्याच्या डिजीटल युगामध्ये विद्यार्थ्यावर आधुनिक उपक्रमासोबत आपली संस्कृती जतन करण्याचे संस्कार पण रुजविणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी केले.



         एकता फाउंडेशन व संस्कृती प्रतिष्ठान उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन प्राथमिक विद्यामंदिर उस्मानाबाद येथे आयोजित पर्यावरणपूरक मातीचे गणपती कार्यशाळा उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस तथा नगरसेविका प्रेमाताई पाटील, प्रशासकीय आधिकारी आदित्य पाटील, एकता फाउंडेशनचे अध्यक्ष अमित कदम, कार्याध्यक्ष विशाल थोरात, कार्यशाळेच्या मार्गदर्शिका रोहिणी नायगावकर, संस्कृती प्रतिष्ठान चे अध्यक्ष राम मुंडे, सचिव प्रवीण गोरे, नेताजी राठोड, प्रशांत जाधवर, मुख्याध्यापक प्रदीप गोरे, अंजली विळेगावे एकता चे सचिव आभिलाष लोमटे आदींची उपस्थिती होती.


          समाजोपयोगी उपक्रम नेहमीच दोन्ही संस्थेच्या माध्यमातून होत असून याबाबत एकता व संस्कृतीचे करावे तेवढे कौतुक कमीच असून पर्यावरण पूरक गणपती कार्यशाळेच्या माध्यमातून पर्यावरण जतनाचा देत असलेला संदेश अभिनंदनीय आहे असे प्रतिपादन यावेळी अस्मिता कांबळे यांनी केले. भविष्यात एकता व संस्कृतीच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे सहकार्य सदैव सोबत आहे अशी ग्वाही यावेळी अस्मिता कांबळे यांनी दिली.

           प्रेमाताई पाटील यांनी सदरील उपक्रमाला शुभेच्छा देत आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ नेहमीच या उपक्रमाच्या पाठीशी राहील असे सांगत एकता व संस्कृतीच्या कामाचे कौतुक केले अशा उपक्रमाची समाजाला नेहमी गरज असून असे नाविन्यपूर्ण उपक्रम नेहमी दोन्ही संस्थेच्या माध्यमातून राबवली जात असून यामध्ये सातत्य आहे असे मत यावेळी प्रेमाताई पाटील यांनी व्यक्त केले.


         आभिलाष लोमटे यांनी प्रास्ताविकपर भाषणात कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट करत आजपर्यंत केलेल्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली. यावेळी रोहिणी नायगावकर व अंजली विळेगावे यांनी गणेश मुर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. यावेळी ऑनलाइनच्या माध्यमातून 620 विद्यार्थी तर प्रत्यदर्शी 30 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षाला पाणी देऊन करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल देशमुख व आभारप्रदर्शन शेषनाथ वाघ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नूतन विद्यामंदिर सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments