पारा (राहुल शेळके ): वाशी तालुक्यातील पारा व परिसरात येथे गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु होता.तसेच फक्राबाद, पारा, डोंगरेवाडी, पिंपळगाव को येथून वाहणाऱ्या मांजरा नदीला पूर आल्यामुळे व पुराचे पाणी नदीपात्रा बाहेर जवळपास 200तें 300मीटर जाऊन शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले असल्यामुळे बुधवारी सकाळी दहा वाजता वाशी तहसीलदारांनी मांजरा नदीच्या पुराची तसेच शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून तलाठ्यांना सूचना केल्या.
ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असेल त्या शेतकऱ्यांनी संबंधित पीक विमा कंपनीला 72तासांच्या आत टोल फ्री नंबर वर किंवा ऍप वर माहिती भरावी अशी माहिती वाशी तहसीलदार नरसिंग जाधव यांनी प्रतिनिधी शी बोलताना दिली.