तेरणा नदीकाठच्या गावांना अति दक्षतेचा इशारा

0
103

 

उस्मानाबाद:- जिल्ह्यात गेले काही दिवस जोरदार पाऊस सुरू असून अनेक प्रकल्प संपूर्ण भारत आहेत.  निम्न तेरणा धरण, माकणी ता. लोहारा भरण्याची शक्यता निर्माण झाल्याने तेरणा नदीकाठच्या गावांना अति दक्षतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

 दिनांक 09/09/2021 रोजीची सकाळी 6.00 वा.ची निम्न तेरणा धरणाची (माकणी धरण) पाणी पातळी 603.40 मी. असून धरणातील उपयुक्त पाणीसाठा 71.45 टक्के आहे.

हवामान खात्याच्या ईशाऱ्यानुसार धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Catchment Area) अतिवृष्टी होण्याची शक्यता असून धरणात येणाऱ्या येव्यामुळे (Inflow) धरण निर्धारीत पातळीस भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर धरणात येणारा येवा तेरणा नदीमार्गे सोडावा लागणार आहे.

तरी, तेरणा नदी काठावारील शेतकरी किंवा नदीकाठी वस्ती करून राहीलेले नागरीक यांना  जिवित व वित्त हानी होणार नाही. यासाठी  सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here